शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

लाॅकडाऊन संपल्यानंतरही मुलांना घराबाहेर सोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 05:00 IST

गोदिया जिल्ह्यात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण आढळून आले. त्यात सर्वाधिक तरुणांचा समावेश होता. मृतांचे प्रमाणही वाढले होते. आता दुसरी लाट ओसरू लागली असून, लवकरच तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. पालकांचा जीव की प्राण असलेल्या लहान मुलांना कोरोना होऊ न देणे यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देसंभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांची घ्या काळजी : बालरोगतज्ज्ञांचा वेळीच सल्ला घ्या

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. दुसऱ्या लाटेत तरुण वर्ग सर्वाधिक बाधित झाला होता, तर तिसऱ्या लाटेत लहान बालके अधिक प्रमाणात बाधित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पालकांची काळजी अधिक वाढली असून लाॅकडाऊन संपल्यानंतरही मुलांना घराबाहेर सोडू नका, त्यांची विशेष काळजी घ्या, लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून डाॅक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन शहरातील बालरोग तज्ज्ञांनी केले आहे. गोदिया जिल्ह्यात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण आढळून आले. त्यात सर्वाधिक तरुणांचा समावेश होता. मृतांचे प्रमाणही वाढले होते. आता दुसरी लाट ओसरू लागली असून, लवकरच तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. पालकांचा जीव की प्राण असलेल्या लहान मुलांना कोरोना होऊ न देणे यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. लाॅकडाऊन संपल्यानंतरही मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नका. काही कामानिमित्त बाहेर गेल्यास विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसल्यास डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेेचे आहे. लहान मुलांना कोरोना झाल्यास त्याच्यासोबत घरातील कुणालातरी रुग्णालयात राहावे लागेल आणि त्यातून पुन्हा कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.  

बाल रुग्णांसाठी २० खाटांचे डेडीकेट केअर युनिट

येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय ६० आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयात ४० बेडचे विशेष वार्ड बालकांसाठी तयार करण्यात येत आहे. सध्या वॉर्डाचे काम बरेच पूर्ण झाले आहे. आता संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना फटका बसण्याची शक्यता लक्षात घेता हे विशेष वॉर्ड तयार केले जात आहे. तसेच औषधसाठा आणि आवश्यक सामुग्री सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अमरिश मोहबे यांनी दिली. 

संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत जिल्हा प्रशासन आतापासूनच सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सकांसह शहरातील बालरोग तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. त्यांच्याकडून येणाऱ्या सूचना आणि उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. प्रभावी उपाययोजना केल्या जाणार आहेत. 

लस येईपर्यंत काळजी घ्यायलाच हवी

संभाव्य तिसऱ्या लाटेपर्यंत १८ वर्षांवरील बहुतांश व्यक्तींचे लसीकरण झालेले असेल, तर १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण होणार नाही. त्यामुळे या वयोगटातील बालकांना कोरोनाचा अधिक धोका संभावतो. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर बालकांना एमआयएससी या आजाराची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनी लक्षणे दिसताच वेळीच काळजी घेण्याची गरज आहे. - डॉ. मनीष तिवारी, बालरोगतज्ज्ञ

सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे लहान मुलांमध्ये दिसल्यास त्वरित टेस्ट करुन डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. लहान मुलांना गर्दीत घेऊन जाऊ नये. घरात कुणी कोरोनाबाधित असेल तर त्याला लहान मुलांपासून दूर ठेवावे. विशेष करून आईने ही काळजी घ्यावी. पालकांनी बालकांमध्ये कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार करुन घ्यावा तसेच योग्य ती काळजी घ्यावी. -डाॅ. प्रदीप गुजर, बालरोग तज्ज्ञ

सीजनेबल फ्रुट, भाजीपाला, पाेष्टिक आहार अधिक द्या, बालकांच्या नियमित लसीकरणाकडे लक्ष द्या, तापाची लक्षणे दिसल्यास त्वरित बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या, शक्यतो लहान मुलांना घराबाहेर पडू देऊ नका. व्हिटॅमिन सी, डी अथवा व्हिटॅमिन बी काॅम्प्लेक्स सायरप द्यायला हरकत नाही. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व स्वच्छता राखणे या त्रिसूत्रीचा वापर करून बालकांवर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.-डाॅ. सुनील देशमुख, बालरोग तज्ज्ञ

लहान मुलांमध्ये कोरोनाचे लक्षण काय?- मोठ्यांमध्ये आढळलेली कोरोनाची लक्षणे साधारणपणे लहान मुलांमध्येही दिसून येतील. - सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, चिडचिडपणा वाढ, डोळे लाल होणे आदी लक्षणे दिसून येतात.- तीव्र कोरोना लक्षणांमध्ये छातीतून घरघर आवाज येऊन बाळ सुस्त राहण्याची शक्यता आहे. तसेच ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यास ओठ निळसर पडू शकतात. 

कोरोनाचा धोका लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आहे. त्यामुळे मोठ्यांनी तातडीने लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सुसज्ज करण्यात आले आहे. लहान मुलांसाठी २० खाटांचा विशेष वाॅर्ड तयार करण्यात येणार आहे. यासाठी बालरोग तज्ज्ञांचे टास्क फोर्स सुध्दा तयार केला आहे. -डाॅ. अमरिश मोहबे, जिल्हा शल्य चिकित्सक

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या