शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

एस्कलेटरच्या लोकार्पणास मुहूर्त मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:27 IST

आॅगस्ट २०१७ मध्येच येथील रेल्वे स्थानकाच्या होमप्लॅटफॉर्मवर एस्कलेटर बसविण्याचे सर्व तांत्रिक काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर त्याची तीनदा टेस्टींगही करण्यात आली. मात्र आज ९ महिन्यांचा कालावधी लोटूनही एस्कलेटरचे लोकार्पण करण्यास रेल्वे प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याचाच प्रकार दिसून येत आहे.

ठळक मुद्देतीनदा झाली टेस्टींग : रेल्वचे अधिकारीही अनभिज्ञ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आॅगस्ट २०१७ मध्येच येथील रेल्वे स्थानकाच्या होमप्लॅटफॉर्मवर एस्कलेटर बसविण्याचे सर्व तांत्रिक काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर त्याची तीनदा टेस्टींगही करण्यात आली. मात्र आज ९ महिन्यांचा कालावधी लोटूनही एस्कलेटरचे लोकार्पण करण्यास रेल्वे प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याचाच प्रकार दिसून येत आहे.तत्कालीन खासदार नाना पटोले यांच्या हस्ते रेल्वे स्थानकावरील विस्तीर्ण अशा शेड बांधकामाच्या भूमिपूजनासह एस्कलेटरच्या कामाचेही भूमिपूजन करण्यात आले होते. शेडचे काम पूर्ण होवून त्याचे लोकार्पण होण्यास वर्षभराचा कालावधीसुद्धा लोटला आहे. त्यानंतर एस्कलेटरचे काम आॅगस्ट २०१७ मध्ये पूर्ण झाले. आता टेस्टींग करून एस्कलेटरची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते.होमप्लॅटफॉर्मवर लावण्यात आलेल्या एस्कलेटरची प्रथम तपासणी करण्यात आली, मात्र त्यानंतर हे यंत्र बंदच ठेवण्यात आले. याबाबत रेल्वेच्या अधिकाºयांकडे चौकशी केल्यावर त्यांनी, एस्कलेटरवर वजन ठेवून टेस्टींग करण्यात येईल, त्यानंतरच ही सुविधा प्रवाशांसाठी मोकळी करून देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र ही दुसरी तपासणी झाल्यावरही एस्कलेटरची सोय प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली नाही. पुन्हा याबाबत रेल्वेच्या अधिकाºयांकडे विचारपूस केली असता पुन्हा टेस्टींग केल्यानंतरच सुरू होईल, असे सांगितले. आता दोन आठवड्यापूर्वीच संपूर्ण दिवसभर एस्कलेटर सुरू ठेवून तिसऱ्यांदा चाचणी घेण्यात आली. मात्र त्यानंतर पुन्हा यंत्र बंदच ठेवण्यात आले. आता या प्रकाराला ९ महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे.गोंदिया स्थानकावर एस्कलेटर सुरू व्हावे, प्रवाशांना त्याचा लाभ व आनंद घेता यावा, यासाठी गोंदियावासीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र रेल्वे प्रशासनाला एस्कलेटरचे लोकार्पण करण्यास ९ महिन्यांपासून मुहूर्तच सापडत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत रेल्वेचे अधिकारीसुद्धा अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.डीसीएम ठरविणार मुहूर्तएस्कलेटरच्या फिटींगचे काम पूर्ण झाले असून ९ महिने झाले आहेत. आवश्यकता टेस्टींग तीन वेळा करण्यात आला. मात्र तरीही लोकार्पण होत नसल्याने नेमका काय प्रकार सुरू आहे, याबाबत रेल्वेच्या अधिकाºयांना विचारणा करण्यात आली. यात त्यांनी रेल्वेचे सिनीयर डीसीएम लोकार्पणाची तारीख कधी व कोणती ठरवितात त्यावर अवलंबून आहे असे सांगीतले.