शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीज कनेक्शन कापू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 21:27 IST

७ तारखेनंतर राज्यातील थकबाकीदार शेतकºयांचे वीज कनेक्शन कापण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. शासनाच्या या आदेशाचा निषेध व्यक्त करीत जिल्हा कॉंग्रेस कमिटीने शेतकºयांचे वीज कनेक्शन कापण्याचे आदेश रद्द करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देकाँग्रेस कमिटीची मागणी : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ७ तारखेनंतर राज्यातील थकबाकीदार शेतकºयांचे वीज कनेक्शन कापण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. शासनाच्या या आदेशाचा निषेध व्यक्त करीत जिल्हा कॉंग्रेस कमिटीने शेतकºयांचे वीज कनेक्शन कापण्याचे आदेश रद्द करण्याची मागणी केली. यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंत्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.निवेदनानुसार, राज्यात अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पिकांवर विपरीत परिणाम पडला आहे. तर गोंदिया जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने कृषी उत्पादनात कमी आली आहे. सोयाबीन, कापूस, धानासारख्या नगदी पिकांना बाजारात योग्य भाव मिळत नाही. तर शासकीय खरेदी केंद्र पूणपणे सुरू झालेले नाही. राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली. मात्र फक्त काहीच शेतकºयांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळाले असून त्यांच्याही खात्यात प्रत्यक्ष कर्जमाफी झालेली नाही.उर्वरित शेतकºयांची स्थिती अत्यंत बिकट असून वीज बिल भरण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत. अशात ७ तारखेपर्यंंत त्यांच्याकडून बिलाचे पैसे भरणे संभव नाही. आतापर्यंत कित्येक शेतकºयांचे पीक पिकले नसून असात वीज कनेक्शन कापल्यास शेवटच्या एका पाण्याअभावी त्यांचे पीक हातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने वीज कनेक्शन कापण्याचा आदेश रद्द करावा अशी मागणी जिल्हा कॉंग्रेस कमिटीने केली आहे. असे न झाल्यास जिल्हा कमिटीसह राज्य कॉंगे्रस कमिटी राज्यात तिव्र आंदोलन करणार व त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य शासन तसेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची राहणार असल्याचे निवेदनात नमूद आहे.निवेदन देताना, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, माजी आमदार रामरतन राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, प्रदेश सचिव विनोद जैन, डॉ. योगेंद्र भगत, जिल्हा परिषद सभापती पी.जी.कटरे, विमल नागपूरे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, हिरालाल फाफनवाडे, झामसिंग बघेले, यादनलाल बनोटे, सहेसराम कोरोटे, अमर वºहाडे, अशोक लंजे, विशाल अग्रवाल, विठोबा लिल्हारे, सिमा मडावी, लता दोनोडे, माधुरी कुंभरे, योगराज उपराडे, हुकुमचंद बहेकार, जहीर अहमद, संदीप रहांगडाले, डेमेंद्र रहांगडाले. राधेलाल पटले, भागवत नाकाडे, धीरेश पटेल यांच्यासह जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.