शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

कुणीही योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये

By admin | Updated: March 4, 2017 00:11 IST

प्रशासनाच्या अडवणुकीच्या धोरणामुळे खेड्यापाड्यातील जनता बेजार झाली आहे.

नाना पटोले : जनता दरबारात ऐकल्या समस्या सडक-अर्जुनी : प्रशासनाच्या अडवणुकीच्या धोरणामुळे खेड्यापाड्यातील जनता बेजार झाली आहे. अनेक समस्यांचा सामना त्यांना करावा लागतो. त्यांच्या समस्यांचे निराकरण करता यावे यासाठी हा जनता दरबार आहे. त्यामुळे शासकीय योजनेच्या लाभापासून कुणीही वंचित राहू नये असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. येथील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीत शुक्रवारी (दि.३) आयोजीत जनता दरबारात ते बोलत होते. याप्रसंगी तहसीलदार तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी विठ्ठल परळीकर, पंचायत समिती सभापती कविता रंगारी, उपसभापती विलास शिवणकर, जिल्हा परिषद सदस्य माधुरी पातोडे, नगराध्यक्ष रिता लांजेवार, पंचायत समिती सदस्य गिरधारी हत्तीमारे, खंडविकास अधिकारी आनंद लोकरे, माजी पं.स.उपसभापती दामोदर नेवारे, पं.स.सदस्य राजेश कठाणे, कृषी अधिकारी पेशेट्टीवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. बबन कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जनता दरबारात वनहक्क जमिनीचे पट्टे या विषयात अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन अतिक्रमण दाखवून पट्टे मिळवून घेतल्याची चर्चा झाली. यावर चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या चुकीची गय केली जाणार नसल्याचे खासदार पटोले यांनी सांगीतले. दरम्यान पाणी टंचाई, महावितरण संदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या, महिला राजसत्ता आंदोलन, रोजगार हमी योजना, घरकूल योजना, स्वस्त धान्य वितरण व्यवस्था आदिंशी संबंधीत समस्या जाणून घेत संबंधीत अधिकाऱ्यांना खासदार पटोले यांनी सूचना केल्या. प्रथमच खासदारांचा जनता दरबार असल्याने तालुक्यातील हजारो नागरिक आपल्या समस्यांची निवेदने घेऊन आली होती. संचालन अनिल मेश्राम यांनी केले. आभार बिडीओ लोकरे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)