लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : तालुक्यातील ग्राम कवलेवाडा येथे खरीप हंगामातील धानपिकाचे मावा-तुडतुडा आदी किडरोगांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या संदर्भात पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश तलाठ्यांना देण्यात यावे. जेणे करुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळू शकेल अशी मागणी कवलेवाडाचे सरपंच तसेच गावकऱ्यांनी केली. यासाठी त्यांनी तहसीलदारांना मागणीचे निवेदन दिले.यंदा परतीच्या पावसाने धानाची नासाडी केली असतानाच रोगराईनेही पिकांना फटका बसला आहे. ग्राम कवलेवाडा येथे मावा-तुडतुडामुळे धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरिही उरल्या-सुरल्या पिकांची कापणी केली जात असून शेतकरी लगेच मळणी करीत आहे. अशात मळणी झाल्यास पंचनामे करण्यात काहीच अर्थ राहणार नाही व शेतकऱ्यांना पिक नुकसानीचा फटका बसणार आहे. त्यामुले लगेच पंचनामे झाल्यास शेतकऱ्याला नुकसान भरपाईचा लाभ मिळविता येईल. करिता तलाठ्यांना लगेच पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी सरपंच किरण पारधी यांच्या गावकऱ्यांनी केली असून तहसीलदारांना निवेदन दिले. निवेदन देताना, मुंडीपारचे सरपंच वासू हरिणखेडे, हेमराज ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य जितेश बोदेले, खुशाल पटले, सचिन ढोमणे, प्रभू बिसेन, मुरलीधर कटरे, विजय रहांगडाले, टानेश्वर रहांगडाले, सरपंच डोलू चौधरी, सरपंच अनिल मरस्कोल्हे, सुधाकर नागपुरे उपस्थित होते.
पीक नुकसानीचे पंचनामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 06:00 IST
लोकमत न्यूज नेटवर्क तिरोडा : तालुक्यातील ग्राम कवलेवाडा येथे खरीप हंगामातील धानपिकाचे मावा-तुडतुडा आदी किडरोगांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
पीक नुकसानीचे पंचनामे करा
ठळक मुद्देकवलेवाडावासीयांची मागणी : तहसीलदारांना दिले निवेदन