शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थी मानधनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 11:28 IST

दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे यासाठी शासनाने संजय गांधी निराधार योजनेतंर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा मानधन देण्याचा निर्णय घेतला. मात्र मागील दोन महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने त्यांना विविध आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देसंजय गांधी निराधार योजना हजारो दिव्यांग प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे, दैनदिन गरजा भागविताना ओढाताण होऊ नये यासाठी शासनाने संजय गांधी निराधार योजनेतंर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा मानधन देण्याचा निर्णय घेतला. मात्र मागील दोन महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने त्यांना विविध आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.संजय गांधी निराधार योजनेतंर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा ६०० रुपये मानधन दिले जाते. तहसील कार्यालयातर्फे हे मानधन दर महिन्याला लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जाते. मात्र स्थानिक प्रशासनाकडून विविध कारणे सांगून मानधन जमा करण्यास विलंब केला जात आहे. कधी निधी नाही तर कधी कर्मचाऱ्यांची अडचण पुढे करुन मानधन जमा करण्यास विलंब केला जातो. जिल्ह्यात अडीच ते तीन हजार लाभार्थी असून त्यांच्या बँक खात्यात जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्याचे मानधन जमा करण्यात आले नाही. परिणामी त्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.तहसील कार्यालयातील कर्मचाºयांना याबाबत विचारणा केल्यास विविध कारणे सांगून परत पाठविले जाते. अनेकांचा दैनंदिन खर्च हा या मानधनावरच अवलंबून आहे. उधार घेऊन गरजा भागविण्याची वेळ आली आहे.

दोन महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेतंर्गत मिळणारे मानधन मिळालेले नाही. परिणामी दिव्यांगाना विविध आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शासनाने त्वरित दखल घेवून समस्या मार्गी लावावी.-श्यामसुंदर बन्सोड,दिव्यांग लाभार्थी गोरेगाव.

टॅग्स :Governmentसरकार