शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगानी मूलभूत अधिकार म्हणून मतदान करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 21:03 IST

आजच्या युगात विविध क्षेत्रात दिव्यांगांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दृष्टीबाधित महिलांनी आपल्यामध्ये आंतरिक ऊर्जा निर्माण करावी. मतदानाचा अधिकार आपले मूलभूत अधिकार असून मतदानाचे हक्क बजावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : मरारटोली येथे कार्यशाळा, विविध जिल्ह्यातील दिव्यांगांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आजच्या युगात विविध क्षेत्रात दिव्यांगांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दृष्टीबाधित महिलांनी आपल्यामध्ये आंतरिक ऊर्जा निर्माण करावी. मतदानाचा अधिकार आपले मूलभूत अधिकार असून मतदानाचे हक्क बजावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.नॅब युनिट महाराष्ट्र व युडीआयएस फोरम कोर्इंबतूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मरारटोली येथे शनिवारी आयोजित कार्यक्र मात त्या बोलत होत्या. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक शशिकांत जे.चवरे, युडीआयएस फोरम कोर्इंबतूरचे व्यवस्थापकीय संचालक एस.सेकरन, समरस्स पंडियन, नाशिकचे उपाध्यक्ष सूर्यभान साळूंखे व सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जि.प.जिल्हा समाज कल्याण अधिकारी एम.आर.रामटेके, गोंदियाचे तहसीलदार राजेश भांडारकर उपस्थित होते. शशिकांत चवरे यांनी प्रास्तावीकातून दृष्टीबाधित महिलांच्या समस्या सक्षम महिलांच्या तुलनेत कशा वेगळयÞा आहेत यावर भर दिला. राजा दयानिधी यांनी दिव्यांगांच्या कल्याणार्थ कायद्यासोबत मानवियतेची जोड आवश्यक आहे. यावर प्रकाश टाकत दिव्यांगांनी न चूकता मतदान करणे आवश्यक असल्याचे सांगितले. समाज कल्याण अधिकारी एम.आर.रामटेके यांनी दिव्यांगाच्या शासनाद्वारे संचालित अनेक योजनांचा आढावा या वेळी सादर केला. राजेश भांडारकर यांनी निवडणूक आयोगाने दिव्यांगानी सुलभपणे मतदान करावे या हेतूने उपलब्ध सवलती बाबत मार्गदर्शन केले. एकदिवस्ीाय कार्यशाळा उत्तरपूर्व महाराष्ट्रातील दृष्टीबाधित महिलांच्या जनजागृतीच्या हेतूने आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत मुंबई, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया व भंडारा या जिल्ह्यातील दृष्टीबाधित महिलांनी सहभाग घेतला. राजेश एस.आसुदानी, अ‍ॅड. प्रिती तुरकर, प्रा.रोशन मडामे व डॉ. सविता बेदरकर यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले. कार्यशाळेला ६० दृष्टीबाधित महिलांसह इतरही दिव्यांग पुरुष व महिलांचा समावेश होता. कार्यशाळेचे औचित्य साधून २०१६ च्या दिव्यांग अधिनियमाची प्रत दृष्टीबाधित महिलांना मोफत देण्यात आली. कार्यशाळेसाठी निरूषा चवरे व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीElectionनिवडणूक