शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा अनलॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 05:00 IST

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे मागील दोन महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे उद्योग धंदे, छोटे मोठे व्यवसाय, वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे अनेकांचा रोजगार गेला तर व्यावसायिकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली. मात्र जिल्ह्यात आता कोरोना संसर्ग आटोक्यात आला असून पॉझिटिव्हिटी रेट सुध्दा २ टक्क्यांच्या आत आहे.

ठळक मुद्देनिर्बंध केले शिथिल : विवाह सोहळ्याला शंभर जणांना उपस्थितीची परवानगी : नियमांचे करावे लागणार पालन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  राज्य शासनाने ५ टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेल्या जिल्ह्यांचा पहिल्या स्तरात समावेश करीत सोमवारपासून अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. गोंदिया जिल्ह्याचा पहिल्याच स्तरात समावेश असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून जिल्ह्यातील निर्बंध पूर्णपणे शिथिल करीत जिल्हा अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि. ७) जिल्ह्यातील सर्वच व्यवहार सुरळीत होणार असल्याने व्यावसायिक आणि जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे मागील दोन महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे उद्योग धंदे, छोटे मोठे व्यवसाय, वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे अनेकांचा रोजगार गेला तर व्यावसायिकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली. मात्र जिल्ह्यात आता कोरोना संसर्ग आटोक्यात आला असून पॉझिटिव्हिटी रेट सुध्दा २ टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळे जिल्ह्यात लागू केलेले निर्बंध पूर्णपणे शिथिल करीत जिल्हात अनलॉक करण्यात येत असल्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी रविवारी सायंकाळी काढले. त्यामुळे सोमवारपासून सर्व व्यवहार पूर्णपणे सुरळीत होणार आहेत. ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच दिलासादायक बाब आहे. 

काय झाले सुरू - अत्यावश्यक वस्तू व सेवांची दुकाने, आस्थपाना - इतर वस्तूंची सर्वच दुकाने, किरकोळ वस्तू विक्री दुकानांचा समावेश- सार्वजनिक मैदाने, उद्याने, प्रार्थना स्थळे, मंदिरे, मार्निंग वॉक, सायकलिंग- सर्वच प्रकारचे खेळ, मैदानी खेळ, प्रशिक्षण- सर्व खासगी व शासकीय कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरू- सभा, निवडणुका घेण्यास परवानगी- सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था, आंतरजिल्हा प्रवासास परवानगी, मालवाहतुकीस परवानगी- जिम, सलून, ब्युटी पार्लर सुरु होणार असून यासाठी ग्राहकांना पूर्वीच अपाॅईंटमेंट घेऊन जावे लागणार आहे.

जिल्हा अनलॅाक झाले असले तरी नियमांचे काटेकोरपणे पालन

अंत्यविधीस २० जणांना परवानगी - कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी जिल्ह्यात अंत्यविधीसाठी २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. आंतरजिल्हा प्रवासाला मुभा- कोरोनाचा संसर्ग विचारात घेता मागील दोन महिन्यापासून आतंरजिल्हा प्रवासासाठी ई-पास अनिवार्य करण्यात आले होते. मात्र आता अनलॉक अंतर्गत हे निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात आले आहे. सर्व प्रकारची वाहतूक आणि आंतरजिल्हा प्रवासास परवानगी देण्यात आली आहे. नियमांचे करावे लागणार पालन - कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने अनलॉक करण्यात आला आहे. मात्र कोरोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे टळलेले नाही. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. सार्वजनिक कार्यक्रमाला ५० टक्के उपस्थिती - सर्वच प्रकारच्या सार्वजनिक व राजकीय कार्यक्रमास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासाठी केवळ ५० टक्के उपस्थितीची परवानगी दिली आहे. यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. माल्स, सिमेनागृह, नाट्यगृह ५० टक्के क्षमतेसह सुरू- माल्स, सिनेमागृह, नाट्यगृहांना ५० टक्के क्षमतेसह साेमवारपासून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र यांना सुध्दा कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागले. तसेच नियमांचे उल्लघंन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. रेस्टाॅरेंट ५० टक्के बैठक क्षमतेने सुरू- सोमवारपासून जिल्ह्यात अनलॉक करण्यात येत असून ५० टक्के बैठक क्षमतेने रेस्टाॅरेंट सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विवाहसोहळ्यास १०० जणांना उपस्थित राहण्यास परवानगी- अनलॉक अंतर्गत विवाह सोहळ्यांना १०० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापेक्षा अधिक लोक उपस्थित असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार