शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दहावीच्या निकालात जिल्हा माघारला

By admin | Updated: June 14, 2017 00:33 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे तर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा गोंदिया जिल्हा माघारला आहे.

जिल्ह्याचा ८३.८० टक्के निकाल : सौंदडचा ओंकार चोपकर प्रथम तर अर्जुनी-मोरगावची प्राजंली कोचे द्वितीय लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे तर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा गोंदिया जिल्हा माघारला आहे. मागच्या वर्षी गोंदिया जिल्हा ८८.२३ टक्के घेऊन नागपूर विभागात प्रथम होता. मात्र या वर्षी फक्त ८३.८० टक्के निकाल लगला असून नगपूर विभागात चवथ्या क्रमांकावर आहे. गोंदिया जिल्ह्याच्या २२ हजार १०२ विद्यार्थ्यांनीपरीक्षेसाठी अर्ज केले होते. यतील २२ हजार ४५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १८ हजार ४१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले अहेत. यात प्राविण्य सूचीत २ हजार ४७४ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ७ हजार ४३ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत१ हजार ३८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्याचा ८५.४९ टक्के निकाल लागला असून गडचिरोली पहिल्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे पुनर्रपरीक्षार्थी म्हणून ९१५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ३५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गोंदिया जिल्ह्यात प्रथम क्रमांक सौंदडच्या के.आर.जे. लोहिया विद्यालयाचा विद्यार्थी ओंकार केशव चोपकर याने पटकावला. त्याला ५०० पैकी ४९३ म्हणजेच ९८.६० टक्के गुण घेतले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर सरस्वती महाविद्यालय अर्जुनी मोरगाव ची प्रांजली प्रभाकर कोचे हिने ९७.४० टक्के गुण घतले. तिच्या गुण पत्रकेत १३ गुण अतिरिक्त जोडून तिचा निकाल शंभर टक्के दाखविण्यात आला. आदर्श विद्यालय आमगावची दिशा यादोराव बघेले ९६.६०, विवेक मंदिर स्कूल गोंदियाचा वैभव मेश्रामला ९६ टक्के मिळले. आदर्श विद्यालय आमगावचा शैलेश बेनीराम नागपुरे ९४.८०, हर्षल देवराम नान्हे ९४.१६, तेजश प्रवीण चंद्रागिरीवार ९३.६०, उषा सुरेश कारंजेकर ९३, शीतल डाकचंद पटले ९२.६०, केतकी सुभाष मेश्राम ९२, रितीका रामलाल ठाकरे ९०.६०, राहुल पुरूषोत्तम कुकरे ९० टक्के गुण मिळविले. विवेक मंदिर गोंदिया येथील श्रीपद देशपांडे ९४.८०, आर्या गुप्ता ९४.४०, श्रेयश मिलिंद लांजेवार ९४.२०, भावेश संजय ठेंगडी ९४, अनुश्री राजकुमार सोनवाने ९३.२०, रागिनी राकेश अग्रवाल ९३, वैभव हिरानंद ठकरानी ९२, इशिता मुकेश अग्रवाल ९१.२०, आकृती सुधाकर निनावे ९०.८०, कृष्णा संतोष तिवारी ९०.६० टक्के गुण मिळविले. मनोहरभाई पटेल विद्यालय देवरी येथील नितेश रमेश चौधरी ९०.४० टक्के, विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय आमगाव येथील पवन डेकाटे ९३.८०, रोहीत एल. चौधरी ९२.२०, अक्षय एस. बघेले ९१.४० व हर्षिताला ९१ टक्के गुण मिळविले. गुरूनानक इंग्रजी माध्यमिक शाळा गोंदिया येथील साक्षी हरीश वाधवानी ९२.४०, श्रृती देवेंद्रकुमार अग्रवाल ९२.२० व प्रगती प्रदीप छटवानी ९१.२० गुण मिळविले. गुजराती राष्ट्रीय विद्यालय गोंदिया गिरीष भक्तराज टेंभूर्णीकर ९२ टक्के गुण मिळविले. सरस्वती विद्यालय अर्जुनी मोरगाव येथील ईशांत दहिकर ९७.२०, भाग्यश्री कापगते ९७, गायश कापगते ९६.४०, खुशबू शहारे ९५.२०, सागर चांदेवार ९४.२०, श्वेता चव्हाण ९४.२०, रोहन राघोर्ते ९३.८०, नूतन लंजे ९३, वैभव मस्के ९२.८०, मोनाली ठाकरे ९२.२०, श्रद्धा बडोले ९२, गोविंद पनपालीया ९१.४०, जयेश रूखमोडे ९१.४०, श्रद्धा खुणे ९१.४०, शर्वरी सांगोडे ९१.२०, माविया अनम पठान ९०.४०, अश्वीनी निर्वाण ९०.४० टक्के गुण मिळविले. सुकन्या संकल्प निकेतन विद्यालय काटी येथील सक्षम मुकेश गुप्ता याने ९० टक्के गुण मिळविले. मुलींनीच मारली बाजी यावेळी ११ हजार १७१ विद्यार्थी व १० हजार ९३१ विद्यार्थीनींनी फार्म भरले होते. याचपैकी ११ हजर १३२ विद्यार्थी व १० हजार ९१३ विद्यार्थीनी परीक्षेल सल्या होत्या. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८१.४० तर मुलींची टक्केवारी ८६.२५ आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. बेस्ट आॅफ फाईव्हचे धोरण बोर्डाचे धोरण बेस्ट आॅफ फाईव्हचे आहे. सहा विषय असले तरी ५०० गुणांचेच मुल्यांकण केले जाते. ५०० पैकी मिळालेल्या गुणांनाच पकडून सामाजिक न्याय विभागाचेही पुरस्कार दिले जाते. सहाव्या विषयाचे गुण ग्राह्य धरल्या जात नाही, अशी माहिती नागपूर बोर्डाचे सचिव पी.आर. पवार यांनी लोकमतला दिली आहे.