शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

जिल्हावासीयांनो, मास्क लावणे अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 05:00 IST

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. तेव्हा प्रत्येकजण मास्क, शारीरिक अंतर तसेच सॅनिटायझर या तीन शस्त्रांचे काटेकोरपणे पालन करताना दिसत होते. मात्र दिवाळीनंतर कोरोनाच उद्रेक कमी झाला असून, जिल्ह्यात कधी ३ अंकांमध्ये नोंदविली जाणारी दररोजच्या कोरोना बाधितांची संख्या आता १ अंकी झाली आहे. शिवाय जिल्ह्यातील क्रियाशील रुग्णांची संख्या आजघडीला १०० च्या आत आली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश : अन्यथा १०० रुपयांचा दंड ठोठावला जाणार

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आल्याचे दिसत असून, नवीन बाधितांची दररोजची आकडेवारी कमी झाली आहे. मात्र याचा अर्थ कोरोना पूर्णपणे गेला नसतानाही नागरिकांकडून कोरोनाविषयक उपाययोजनांना बगल दिली जात आहे. कित्येक नागरिक मास्क न लावता फिरताना दिसत आहेत. तर बाजार व अन्य ठिकाणांवरही शारीरिक अंतराचे पालन टा‌ळले जात आहे. हा प्रकार धोकादायक असल्याने आता खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हावासीयांना मास्क लावणे अनिवार्य असल्याचे आदेश काढले आहेत. अन्यथा १०० रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. 

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. तेव्हा प्रत्येकजण मास्क, शारीरिक अंतर तसेच सॅनिटायझर या तीन शस्त्रांचे काटेकोरपणे पालन करताना दिसत होते. मात्र दिवाळीनंतर कोरोनाच उद्रेक कमी झाला असून, जिल्ह्यात कधी ३ अंकांमध्ये नोंदविली जाणारी दररोजच्या कोरोना बाधितांची संख्या आता १ अंकी झाली आहे. शिवाय जिल्ह्यातील क्रियाशील रुग्णांची संख्या आजघडीला १०० च्या आत आली आहे. ही जिल्ह्यासाठी नक्कीच दिलासादायक बाब असली तरिही याचा अर्थ कोरोना पूर्णपणे गेला, असा होत नाही. कारण, आताही दररोज नवीन बाधितांची भर पडत असून, कोरोनामुळे मृतांची संख्याही वाढत चालली आहे. हे टाळता येणार नाही. 

अशात जिल्हावासीयांनी आजही पूर्वीप्रमाणेच कोरोनाविषयक ३ शस्त्रांचे न विसरता पालन करण्याची गरज दिसून येत आहे. मात्र कोरोनाचा उद्रेक कमी झाल्याचा अर्थ जिल्हावासी काही भलताच काढत आहेत. नेमकी हीच बाब हेरून व जिल्हावासीयांच्या या अतिरेकी वागणुकीला बघता जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी लागणार, असे आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे मास्क हेच सर्वात प्रभावी शस्त्र ठरले असल्याने मास्कचा वापर अनिवार्य राहणार, असे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी आदेशातून कळविले आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित व्यक्ती तसेच आस्थापनांवर भारतीय दंड संहिता १८६० (४५) च्या कलम १८८ नुसार  शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे समजण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे.  

५०० ऐवजी आता १०० रुपयांचा दंड मध्यंतरी कोरोनाचा उद्रेक असताना जिल्ह्यात मास्क न वापरता फिरणाऱ्यांवर ५०० रुपयांचा दंड ठोठावला जात होता. मात्र मध्यंतरी पालकमंत्री अनिल देशमुख यांनी बैठकीत हा दंड कमी करीत १०० रुपयांवर आणला आहे. त्यामुळे आता मास्क न वापरणाऱ्यांवर १०० रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. यामुळे नागरिकांनी दंडासाठी नाही, तर किमान आपल्या व पुढील व्यक्तीच्या सुरक्षेसाठी तरी मास्क लावणे गरजेचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी