शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
4
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
5
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
6
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
7
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
8
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
9
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
12
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
13
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
14
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
15
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
16
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
17
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
18
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
19
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
20
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 

जिल्ह्याला मिळाले आणखी ९५२० डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 23:30 IST

केंद्र शासनाने भारत निर्मित कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींना मंजुरी दिल्यानंतर अवघ्या देशातच १६ मार्चपासून लसीकरणाला सुरुवात झाली. यात सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली असून, त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्सला लस देण्यात आली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव काही थांबलेला नाही. उलट कोरोना आता कहर करीत असल्याने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षांवरील काही आजार असलेल्या नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसंपूर्ण कोविशिल्डच्या लस : एकूण ८९४२० डोस प्राप्त, लसीकरणाला आली गती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्ह्यात लसीकरण गती घेत असतानाच लसींचा तुटवडा जाणवू नये यासाठी मंगळवारी (दि. २३ मार्च) जिल्ह्याला आणखी ९,५२० डोसेसचा पुरवठा करण्यात आला आहे. यंदा मिळालेले हे डोस कोविशिल्डचे असून, यानंतर आता जिल्ह्याला एकूण ८९,४२० डोस प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाने भारत निर्मित कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींना मंजुरी दिल्यानंतर अवघ्या देशातच १६ मार्चपासून लसीकरणाला सुरुवात झाली. यात सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली असून, त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्सला लस देण्यात आली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव काही थांबलेला नाही. उलट कोरोना आता कहर करीत असल्याने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षांवरील काही आजार असलेल्या नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी शहरातील खासगी रुग्णालयांनाही लसीकरणासाठी लस उपलब्ध करवून देण्यात आली आहे. परिणामी, आता लसीकरणाला वेग येत असून, लसींची गरज भासत आहे. यामुळे जिल्ह्याला पुन्हा एकदा लसींचा पुरवठा करण्यात आला असून, मंगळवारी (दि. २३ मार्च) जिल्ह्याला लसीचे आणखी ९,५२० डोस मिळाले आहेत. यंदा जिल्ह्याला मिळालेले हे संपूर्ण डोस कोविशिल्डचे आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील बुधवारपर्यंतची (दि. २४ मार्च) लसीकरणाची स्थिती बघता लसीकरण करण्यात आलेल्या एकूण ६१,३०४ नागरिकांपैकी ४८,५३३ नागरिकांनी कोविशिल्डचीच लस घेतली आहे. यामुळे जिल्ह्यात कोविशिल्ड लसीलाच नागरिक जास्त पसंती देत असल्याचे दिसत आहे. 

लसीकरणासाठी पुढे येण्याची गरज राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला आहे. त्याचे पडसाद जिल्ह्यातही उमटत असून, कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात आता लस आली असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी लसीकरण करवून घेणे गरजेचे आहे. मात्र, त्यानंतरही नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे आकडेवारीवरून बोलता येते. लसीकरणाला आता अडीच महिने पूर्ण होत असून, झालेले लसीकरण तुलनेत कमीच आहे. अशात आता नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे येऊन लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी केले आहे.

६४४२० कोविशिल्ड लसींचा पुरवठा जिल्ह्यात आतापर्यंत लसींचे ८९,४२० डोस मिळाले आहेत. यामध्ये १४ जानेवारी रोजी १०,००० डोस, १ फेब्रुवारी रोजी ८,००० डोस, १५ फेब्रुवारी रोजी ८,३०० डोस, २ मार्च रोजी १०,६०० डोस मिळाले आहेत. हे संपूर्ण डोस कोविशिल्डचे होते. १२ मार्च रोजी ४३,००० डोस मिळाले असून यामध्ये १८,००० डोस कोविशिल्डचे तर २५,००० डोस कोव्हॅक्सिनचे आहेत. तसेच २३ मार्च रोजी ९,५२० डोस मिळाले असून, हे संपूर्ण डोस कोविशिल्डचेच आहेत. अशा प्रकारे जिल्ह्याला आतापर्यंत मिळालेल्या एकूण ८९,४२० डोसेसमध्ये ६४,४२० डोस कोविशिल्डचे आहेत.  

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस