शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला मिळाले आणखी १७२०० डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 05:00 IST

कोरोनाचा वाढता उद्रेक बघता यावर तोडगा म्हणून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. यामुळे केंद्र शासनाने लसीकरणावर भर दिला असून त्यादृष्टीने काम सुरू आहे. परिणामी, जिल्ह्यातही लसीकरण लवकराच लवकर आटोपता यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हे सर्व सुरू असताना लसींचा तुटवडा होऊन लसीकरण थांबू नये याची दक्षता घेत शासनाकडून जिल्ह्याला शनिवारी (दि. ३) आणखी १७२०० डोस मिळाले आहेत.

ठळक मुद्देसर्व डोस कोव्हीशिल्डचेच : लसीकरणाला येतोय वेग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण व्हावे, यासाठी केंद्र शासनाकडून प्रयत्न केले जात असतानाच त्याला प्रतिसाद देत जिल्ह्यात कोरोना लसीकरण जोमात सुरू आहे. अशात लसींचा तुटवडा जाणवू नये म्हणून शासनाकडून लसींचा पुरवठा केला जात असून शनिवारी (दि.३) जिल्ह्याला आणखी १७२०० डोस मिळाले आहेत. हे सर्व डोस कोव्हीशिल्ड लसीचे असून यामुळे लसीकरणाला आणखी गती येणार, यात शंका नाही. कोरोनाचा वाढता उद्रेक बघता यावर तोडगा म्हणून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. यामुळे केंद्र शासनाने लसीकरणावर भर दिला असून त्यादृष्टीने काम सुरू आहे. परिणामी, जिल्ह्यातही लसीकरण लवकराच लवकर आटोपता यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हे सर्व सुरू असताना लसींचा तुटवडा होऊन लसीकरण थांबू नये याची दक्षता घेत शासनाकडून जिल्ह्याला शनिवारी (दि. ३) आणखी १७२०० डोस मिळाले आहेत. हे सर्व डोस कोव्हीशिल्ड लसीचे आहेत. आतापर्यंत जिल्ह्याला १८२३४० डोस मिळाले असून यामध्ये १३२३४० डोस कोव्हीशिल्ड लसीचे आहेत. विशेष म्हणजे, गुरुवारी (दि.१) जिल्ह्याला ९२९२० डोसेसचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यात आता शनिवारी आणखी १७२०० डोस मिळाल्याने लसींचा तुटवडा निर्माण होणार नाही, हे विशेष.

कोविड लस पूर्णपणे सुरक्षित आहे. लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती निश्चितच वाढेल. तो आणखी सुरक्षित होईल. त्यामुळे ४५ वर्षांवरील प्रत्येकाने लस घेणे आवश्यक आहे. - डॉ. सुवर्णा हुबेकर, निवासी वैद्यकीय अधिकारीनागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता लसीकरणासाठी पुढे यावे. उलट कोविड लसीमुळे सुरक्षितता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरणाचा अस्त्र म्हणून वापर होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक गावातील सुशिक्षित युवकांनी जनजागृती करण्याची गरज आहे. - डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस