शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्राम उदय ते भारत उदय’साठी जिल्हा सज्ज

By admin | Updated: April 15, 2016 02:18 IST

केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाच्या निर्देशानुसार ग्राम उदय ते भारत उदय कार्यक्रम १४ ते २४ एप्रिलदरम्यान राबविण्यात येत आहे.

प्रत्येक दिवशी विशेष कार्य: व्हीएचएनएससीअंतर्गत विशेष कार्यक्रम गोंदिया : केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाच्या निर्देशानुसार ग्राम उदय ते भारत उदय कार्यक्रम १४ ते २४ एप्रिलदरम्यान राबविण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात हे कार्यक्रम व्हीएचएनएससीच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक दिवशी एक खास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.केंद्र सरकारच्या पंचायत राज विभागाच्या निर्देशानुसार गोंदिया जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासून २४ एप्रिल पर्यंत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती (वीएचएनएससी) अंतर्गत प्रत्येक गाव निहाय कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आयोजन करण्यात येत आहे. अभियान चालविण्यासाठी व नियोजनासाठी २० एप्रिलपासून गाव निहाय व्हीएचएनएससी ची बैठक ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. बैठकीत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, ग्राम पंचायत सदस्य, शिक्षक, आंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचा समावेश आहे. कार्यक्रमांतर्गत २१ एप्रिल रोजी आरोग्य विषयक जनजागृतीसाठी सकाळी प्रभातफेरी काढणे, ग्रामसभेचे आयोजन करून विषयावर चर्चा करणे, गाव स्तरावर विविध विभागाच्या माध्यमातून प्राप्त निधीच्या माध्यमातून गावाचा विकासाचे नियोजन करणे, आरोग्य स्तरावर सुधारासाठी स्वच्छता, पाणीपुरवठा व स्वच्छतीसाठी प्रयत्न करणे, ग्रामीण विकासात महिलांचा सहभाग वाढविणे, गावात अनुसूचित जाती, जमाती, अपंग व मागास वर्गासाठी उपयुक्त प्रयत्न करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या सोबत २१ ते २४ एप्रिल दरम्यान शंभर टक्के गर्भवतींची नोंदणी, संस्थेतच प्रसूती,रक्त तपासणी, सर्व गटातील हिमोग्लोबीन तपासणी करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त रक्तदाब, मधुमेह, कर्करोग (स्तन कर्करोग, सर्विकल कर्करोग व इतर), तंबाखू नियंत्रण व तोंडाचा आजार या विषयावर जनजागृती करण्यात येणार आहे. ३ ते ५ रक्तदान शिबिर, मोतियाबिंदू महिलांच्या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. सिकलसेल थैलेसेमिया चा पाठपुरावा करण्यात येणार आहे. आरजीजेएवाय शिबिर, आरबीएसके महिला लाभार्थी, रेफर महिला, महिला रोग निदान उपचार, ईएसआईएस अस्पताल में आॅपरेशन शिबिर, आशा व इतर महिलांची तपासणी तज्ज्ञांद्वारे करण्यात येईल. २२ ते २४ एप्रिल दरम्यान आयुष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ५-७ आयुष शिबिर आयोजित करणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)