शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

तलावांचा जिल्हा पडतोय कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 21:21 IST

यंदा सुरूवातीला दमदार हजेरी लावलेल्या पावसाने परतीच्या कालावधीत पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्पांनी तळ गाठल्याने तलावांचा जिल्हा कोरडा पडत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देअनेक तलावांनी गाठला तळ : पाणी टंचाईचे संकट गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा सुरूवातीला दमदार हजेरी लावलेल्या पावसाने परतीच्या कालावधीत पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्पांनी तळ गाठल्याने तलावांचा जिल्हा कोरडा पडत असल्याचे चित्र आहे.मागील तीन चार वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस होत असल्याने त्याचा परिणाम शेती आणि सिंचन प्रकल्पावर होत आहे. अत्यल्प पाणीसाठ्यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर होत आहे. जिल्ह्यात सिंचन योग्य एकूण ६९ प्रकल्प आहे. तर चार प्रकल्प मोठे आहे. यापैकी तीन प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी दिले जाते. मात्र यंदा या चारही मोठ्या प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने रब्बी हंगामासाठी केवळ इटियाडोह जलाशयाचे पाणी २१०० हेक्टरला देण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामुळेच यंदा जिल्ह्यातील शेतकºयांनी रब्बी धानाची लावगड करु नये असे आवाहन कृषी विभागाने केले होते. मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प व मालगुजारी तलाव ज्यांचा उपयोग शेतकºयांना सिंचनासाठी होतो अशा तलावांची संख्या ६५ आहे. मात्र सध्या स्थितीत यापैकी १४ तलावात केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर चिरचाळबांध व तेढा येथील तलावांनी आताच तळ गाठला आहे. मध्यम प्रकल्पाच्या चोरखमारा जलाशयात केवळ ७.३४ टक्के पाणीसाठा आहे. तर लघु प्रकल्पाच्या भदभदया तलावात ४.४३ टक्के, गुमडोह ३.९६ टक्के, रेहाडी ७.४५, रिसामा ३.१२, सोनेगाव ६.८५, सडेपार ०.३२, सेरपार जलाशयात केवळ ३.४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर १० ते २० टक्के पाणीसाठा असलेले १५ जलाशयांचा समावेश आहे. बोदलकसा १७.०३ टक्के, चुलबंद १९.०३, रेेंगेपार १३.६६, आक्टीटोला १६.५३, पांगडी १७.४, राजोली ११.७२, जुनेवानी १९.६५ टक्के, बोपाबोडी १५.०६, काटी १७.३७, कोकणा १५.३८, खाडीपार १४.७८, निमगाव १२.७५, खोेडशिवणी १९.९६, नांदलपार ११.०७, ताडगाव ११.५० टक्के पाणीसाठा आहे.शहराची भिस्त पुजारीटोलावरमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेतंर्गत शहरवासीयांना पिण्याचा पुरवठा केला जातो. मात्र मागील वर्षी वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे गोंदियापासून ८० किमी अंतरावर असलेल्या पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणून शहरवासीयांची तहान भागविण्यात आली होती. तिच परिस्थिती यंदा असणार असून प्रशासनाने त्यादृष्टीने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.मागील वर्षीच्या तुलनेत स्थिती बिकटजिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुनलेत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर झाला आहे. जिल्ह्यातील ६५ तलावात सध्यास्थितीत केवळ २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ९ मध्यम प्रकल्पात २८.९३ टक्के, लघु प्रकल्पात २८.६९ टक्के पाणीेसाठा आहे. मामा तलावात ३१ टक्के पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे यंदा जानेवारी महिन्यातच अनेक सिंचन प्रकल्पांनी तळ गाठल्याने यंदाचा उन्हाळा चांगलाच कडक असणार असल्याचे बोलल्या जात आहे.