विक्री जोमात असल्याचा पुरावा : एका दिवसात ५३ विक्रेत्यांवर कारवाईगोंदिया : विदर्भातील दोन जिल्ह्यात दारूबंदी यशस्वी होत असताना शेजारचा जिल्हा म्हणून असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मात्र दारूचा महापूर वाहात आहे. मुंबई येथे विषारी दारूमुळे शंभरावर लोकांचा मृत्यू झाल्याने गृह विभाग खडबडून जागा झाला. त्यामुळे या अवैध दारूविक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करणे भाग पडत आहे. जिल्ह्यात सोमवारी एकाच दिवशी करण्यात आलेल्या कारवाईत ५३ दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डुग्गीपार पोलिसांनी शालिकराम लहु डोंगरे (६५) रा. मंदीटोला यांच्याकडून १२ देशी दारुचे पव्वे, राजगुडा येथील नागेश मनीराम वैद्य (४०) याचकडुन ४ लीटर देशी दारु व पाच देशी दारुचे पव्वे, बावणी येथील कलीम रफीक शेख (३५) याचकडून पाच नग देशी दारुचे पव्वे, दवनीवाडा पोलिसांनी मनुबाई राजकुमार वासनिक (५०) रा. खडबंदा हिच्याकडून १५ लीटर हातभट्टीची दारु, महेंद्र शालिकराम साठवणे (४५) रा. खळबंदा यांच्याकडून १० लीटर हातभट्टीची दारु, दवनीवाडा पोलिसांनी गोंडमोहाडी येथील रमेश जंगलु राऊत (६०) याचकडून दहा लिटर हातभट्टीची दारु, पुष्पाबाई बालचंद नेवारे (३५) हिच्याकडून ३० लीटर हातभट्टीची दारु, मुसानी येथील दुर्गाबाई खुशाल वरठी या महिलेकडून पाच लिटर हाथभट्टीची दारु, लोधीटोला येथील सुनिता भिमराव मारबते (३६) हिच्याकडून १५ लिटर हातभट्टीची दारु, अत्री येथील दुर्गेशे भुवनलाल पटले (२२) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु, परसवाडा येथील धरमदास बाबुजी राऊत (५१) यांच्याकडून १५ लीटर हातभट्टीची दारु, अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या वडेगाव रेल्वे येथील श्रीराम लक्ष्मण बेतुगेवार (३६) वर्ष याच्याकडून नऊ देशी दारुचे पव्वे, रावणवाडी पोलिसांनी चिचटोला दासगाव नाका येथे रविवारच्या दुपारी ४ वाजता धाड घालून १७० किलो मोहफुल व दारु गाळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. बारव्हा येथील महेंद्र सिमर परचादी (३०) याच्याकडून पाच नग देशी दारुचे पव्वे, प्रतापगड येथील मनोहर सिताराम सलाम (३५) यांच्याकडून पाच नग देशी दारुचे पव्वे जप्त केले.गोंदिया ग्रामीण पोलिसांनी आसाली येथील योगेश पांडू महेंद्र मेश्राम याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु, नागरा येथील विमला जुवारीलाल चिखलोंढे (४५) या महिलेकडून पाच लिटर हातभट्टीची दारु, गणखैरा येथीला गोयुलदास आसाराम सहारे (५९) याचकडून १० लिटर मोहफुलाची दारु, गोरेगाव पोलिसांनी गिधाडी येथील संजय मनसाराम शेंडे (४०) यांच्याकडून पाच नग देशीदारुचे पव्वे, शिलेगाव येथील हिरालाल शेऊतकर (४८) याच्याकडून दहानग देशी दारुचे पव्वे, म्हसगाव येथील देवचंद किसन बारेवार (५०) याच्याकडून सहानग देशी दारुचे पव्वे रामनगर पोलिसांनी इंदिरानगर कुडवा येथील नरेश किसन मेश्राम (५०) याच्याकडून दहा नग देशी दारुचे पव्वे, देवरी पोलिसांनी मरामजोग येथील चुन्नीलाल रायाजी नंदेश्वर (४२) याच्याकडून १३ नग देशी दारुचे पव्वे, मुल्ला येथील दादू तुळशीराम फुल्लुके याच्याकडून पाच देशी दारुचे पव्वे, सतोना येथील राजेश रामचंद खैरवार (३९) याच्याकडून पाच लिटर हाथभट्टीची दारु, बहेगा तोहली मनी (५५) वर्ष रा. मरारटोला याच्याकडून नऊ लिटर हातभट्टीची दारु, कामठा येथील इंदिरा हिरालाल बागडे (४५) हिच्याकडून सात लिटर हाथभट्टीची दारु, अशोक लालचंद चिखलोंढे यांच्याकडून पाच लिटर हातभट्टीची दारु, हरिलाल देवीलाल बारई (३५) रा. चुटीया याच्याकडून पाच लिटर हातभट्टीची दारु, लेंढेझरी येथील नानु चंदु लामकासे यांच्याकडून १५ लिटर हाथभट्टीची दारु, गंगाझरी येथील राजू कारु चिखलोंढे ४० याच्याकडून पाच लिटर हातभट्टीची दारु, ढाकणी येथील मनोज कवडू बोपचे (२५) याच्याकडुन पाच लिटर हाथभट्टीची दारु, ओझीटोला येथील शंकर साबुराम दुर्वे (३८) यांच्याकडून दहा लिटर हातभट्टीची दारु, एकोडी येथील राजेश श्रीचंद भलावी (४०) वर्ष याच्याकडून पाच लिटर हातभट्टीची दारु, रामदास मंजल्या मंडाराम (५५) याच्याकडून पाच लिटर हातभट्टीची दारु जप्त केली. (तालुका प्रतिनिधी)
दारूच्या बळीनंतर जिल्हा पोलिसांना जाग
By admin | Updated: June 24, 2015 01:55 IST