शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
4
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
5
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
6
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
7
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
8
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
9
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
10
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
11
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
12
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
13
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
14
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
15
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
16
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
18
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
19
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
20
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

जिल्हास्तरीय आदिवासी संमेलन

By admin | Updated: August 14, 2016 02:03 IST

विश्व आदिवासी दिनाचे औचित्य साधून सालेकसा येथे गुरूवारी जिल्हास्तरीय आदिवासी संमेलन आयोजित केले होते.

अधिकार, स्वातंत्र्यावर चर्चा : गुलामगिरीतून बाहेर पडण्याचे आवाहन सालेकसा : विश्व आदिवासी दिनाचे औचित्य साधून सालेकसा येथे गुरूवारी जिल्हास्तरीय आदिवासी संमेलन आयोजित केले होते. आदिवासी सांस्कृतिक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन दिल्ली येथील राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे प्रचारक तिरूमाल लोहे यांच्या अध्यक्षतेत पं.स.सभापती हिरालाल फाफनवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.समाजकल्याण सभापती देवराज वडगाये, जि.प.सदस्य विजय टेकाम, गटशिक्षणाधिकारी वाय.सी.भोयर, एन.डी.वाघमारे, सुकलाल राऊत, मनिष पुसाम, माजी जि.प.सदस्य शंकरलाल मडावी, मनोहर उईके, बारेलाल वरखडे व इतर आदिवासी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके, राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांनी देशात आदिवासीचा विकास, अधिकार, स्वातंत्र्य यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी आदिवासीची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगती बद्दल सविस्तर विचार मांडण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष लोहे यांनी आदिवासीना मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याचे आवाहन केले. आदिवासी हे भारताचे मूळ निवासी असून त्यांना त्यांचे अधिकार मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी आदिवासीनी संघटीत होऊन शासनाशी संघर्ष करण्याचे आवाहन केले. संचालन वीरेंद्र उईके तर आभार राजेश भोयर यांनी मानले. यशस्वीतेसाठी राधेश्याम टेकाम, अरविंद सोयाम, राजेश वट्टी, लालसिंग कोडापे, सोमु कुचलाम, लखन टेकाम, संतोष उईके, मन्नेलाल आचले, गणेश उईके, रमन सलाम, राधेलाल धुर्वे, किशोर उईके, प्रशांत उईके, डी.एस.परसगाये, वसतीगृहातील विद्यार्थ्यानी सहकार्य केले. यात आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन आदिवासी पिपल्स फेडरेशनचे पदाधिकारी सुध्दा सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)