शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात 1477 लिटर लस साठवणुकीची क्षमता तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 05:00 IST

केंद्र शासनानेही लसीकरणाच्या दृष्टीने आपल्या सर्वच राज्यांना तयारीला लागण्यासाठी निर्देश दिले आहेत. मात्र लसीकरणासाठी टप्पे ठरवून देण्यात आले असून पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील व्यक्तींनाच लस दिली जाणार आहे. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. माहिती नुसार, जिल्ह्यात १४७७ लीटर लस साठवणुकीची क्षमता असून प्रत्येक तालुक्यापर्यंत लस वितरण व साठणुकीसाठीचे नियोजन करून ठेवले आहे.

ठळक मुद्देलसीकरणासाठी जिल्हा सज्ज : पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण

    लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  वर्षभरापासून अवघ्या जगात हाहाकार माजवून ठेवलेल्या कोरोनावर आता नियंत्रण मिळविण्यासाठी संशोधकांच्या अथक प्रयत्नांमुळे लस स्वरूपात एक आशेची  किरण दिसून येत आहे. त्यामुळे आता अवघ्या जगाच्या नजरा या लसीकडे लागल्या असून कधी लसीकरणाला सुरूवात याची वाट सर्वच बघत आहेत.  केंद्र शासनानेही लसीकरणाच्या दृष्टीने आपल्या सर्वच राज्यांना तयारीला लागण्यासाठी निर्देश दिले आहेत. मात्र लसीकरणासाठी टप्पे ठरवून देण्यात आले असून पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील व्यक्तींनाच लस दिली जाणार आहे. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. माहिती नुसार, जिल्ह्यात १४७७ लीटर लस साठवणुकीची क्षमता असून प्रत्येक तालुक्यापर्यंत लस वितरण व साठणुकीसाठीचे नियोजन करून ठेवले आहे. यात प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून, ग्रामीण रूग्णालयांनाही सामावून घेत त्यांचीही सोय करण्यात आली असून आता फक्त लस येण्याची वाट आहे. 

डिप फ्रिजरची व्यवस्थाकोरोनावर मात करणारी लस आता लवकरच येणार असल्याने केंद्र शासनाकडून लसीकरणासाठी नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, जिल्हयातील आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. लसीच्या साठवणुकीसाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून, ग्रामीण रूग्णांलयांपर्यत डीप फ्रिजरची सोय करण्यात आली आहे. 

व्हॅक्सीन व्हॅनद्वारे होणार लसीचे वितरण लस आल्यानंतर तिचे वितरण जिल्ह्यातील आठही तालुक्यांत करावे लागणार आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेकडून व्हॅक्सीन व्हॅनद्वारे वितरण केले जाणार आहे. लसी साठवणुकीच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्ण, जिल्हा व उपजिल्हा रूग्णालय तयार करण्यात आले असून यंत्रणा सज्ज आहे. 

लसीकरणाला घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांचे राज्यस्तर व जिल्हास्तरावर प्रशिक्षण झाले आहे. आता तालुकास्तरावर कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. लसीकरणाला घेऊन जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. - डॉ.नितीन कापसेजिल्हा आरोग्य अधिकारी

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या