शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी केली बीजीडब्ल्यू रुग्णालयाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:18 IST

येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालय (बीजीडब्ल्यू) व रक्तपेढी संदर्भातील तक्रारींमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. रक्तपेढीत रक्त मिळत नसल्याची ओरड वाढली आहे.

ठळक मुद्देरक्तपेढीतील सोईसुविधांचा आढावा : सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालय (बीजीडब्ल्यू) व रक्तपेढी संदर्भातील तक्रारींमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. रक्तपेढीत रक्त मिळत नसल्याची ओरड वाढली आहे. याच सर्व गोष्टींची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी गुरूवारी या रुग्णालयाला व रक्तपेढीला आकस्मिक भेट देवून तेथील सोयी सुविधांचा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही, यादी दक्षता घेण्याचे निर्देश दिले.जिल्हाधिकारी बलकवडे यांनी भेटी दरम्यान संपूर्ण बीजीडब्ल्यू रुग्णालयाची व परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ब्लड बँकेला भेट देवून तेथील सोयी सुविधांचा आढवा घेतला. या रुग्णालयात दररोज किती रुग्ण दाखल होतात, रुग्णालयात रुग्णांसाठी किती खाटांची व्यवस्था आहे. त्यांना औषधांचे योग्य वितरण केले जाते किंवा नाही याची माहिती घेतली. तसेच दाखल असलेल्या रुग्णाकडून त्यांनी माहिती घेतली. या वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. व्ही.पी.रुखमोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पातुरकर, बीजीडब्ल्यू रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सायास केंदे्र व इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. यादरम्यान आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी बलकवडे यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. विशेष म्हणजे आठदिवसांपूर्वीच लोकमतने जिल्ह्यातील बालमृत्यूची बातमी प्रकाशीत केली होती. यात बीजीडब्ल्यू रूग्णालयात सर्वाधिक बालमृत्यू झाल्याची बाब पुढे आणली. रुग्णालयाच्या भेटी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांना विविध प्रश्न केल्याची माहिती आहे. तर अधिकाऱ्यांनी सुध्दा त्यांच्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. महाराष्ट्रात बालमृत्यूचे प्रमाण १४ टक्के असून गोंदिया जिल्ह्यातील बालमृत्यूचा दर १०.५० टक्के आहे. त्यामुळे यावर वेळीच उपाय योजना करून बालमृत्यूचा दर कमी करण्याचे निर्देश बलकवडे यांनी दिले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील रुग्णांना दिल्या जाणाऱ्या पाण्याची व्यवस्था व प्रसाधानगृहांची पाहणी केली. तसेच स्वच्छतेवर भर देण्याचे निर्देश दिले.दर आठवड्याला घेणार बैठकजिल्हाधिकारी बलकवडे यांनी बीजीडब्ल्यू रुग्णालयाला भेट दिल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी रुग्णालयाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. बीजीडब्ल्यू रुग्णालयातील बाल व माता मृत्यूचा दर कमी करण्याच्या विषयावर या बैठकीत बरेच मंथन करण्यात आले. रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी काय करता येईल याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सूचना मागविल्या. रुग्णालयाला निधी कसा उपलब्ध करुन देता येईल, पालकमंत्र्यांची काही मदत घेता येईल का? यावर मंथन करण्यात आले. याच बैठकीत दर आठवड्याला बीजीडब्ल्यू समस्यांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल