शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीदरम्यान सीमेलगतच्या जिल्हा प्रशासनाने सतर्क राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:00 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोट निवडणुकीसाठी भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील प्रशासन सज्ज असले तरी सीमेलगतच्या जिल्हा प्रशासनाने सतर्क राहणे आवश्यक आहे. या काळात सीमेलगतच्या जिल्ह्यातून अवैद्य दारु व पैशाची वाहतूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची सूचना : अवैध दारू व पैशाची वाहतूक होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा पोट निवडणुकीसाठी भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील प्रशासन सज्ज असले तरी सीमेलगतच्या जिल्हा प्रशासनाने सतर्क राहणे आवश्यक आहे. या काळात सीमेलगतच्या जिल्ह्यातून अवैद्य दारु व पैशाची वाहतूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक आयोगाचे निर्देश लक्षात घेता भंडारा-गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या जिल्हा प्रशासनाने याबाबतीत विशेष पथकाची नियुक्ती करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यात यावा, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिल्या आहेत.जिल्हाधिकारी कार्यालय येथे सीमेलगतच्या बालाघाट, राजनांदगाव, नागपूर ग्रामीण, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याच्या अधिकाºयांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीस निवडणूक निरिक्षक मो. शफी उल हक, जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी निवडणूक विलास ठाकरे व इतर अधिकारी उपस्थित होते.सीमेलगतच्या जिल्हा प्रशासनाने भंडारा-गोंदिया जिल्हा प्रशासनाशी समन्वय ठेवावा असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, सीमेलगतच्या परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सीमेलगच्या भागातून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक निवडणूक असलेल्या क्षेत्रात प्रवेश करणार नाही. तसेच मतदारावर विशिष्ट उमेदवाराला मतदान करण्यासाठी दबाव आणणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात यावी. दारु बंदी विभागाने जिल्ह्याच्या सीमा लगतच्या भागातील ५ किलोमीटर अंतरावर दारु विक्री होणार नाही, याबाबत पोलीस अधीक्षक बालाघाट, पोलीस अधिक्षक राजनांदगाव व नागपूर ग्रामीण यांच्यासोबत चर्चा करु न त्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्याबाबत सभेत निर्देश दिले.भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व उपजिल्हाधिकारी निवडणूक भंडारा व गोंदिया यांनी आपले मोबाईल नंबर हे सीमेलगत भागातील अधिकारी यांच्यासोबत आदानप्रदान करण्याबाबत सूचना सभेत करण्यात आली.

टॅग्स :collectorतहसीलदार