शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आठ हजार शेतकऱ्यांना कीटकनाशक वाटप

By admin | Updated: September 21, 2016 00:56 IST

रोगराईची रोकथाम करून धोक्यात आलेल्या पिकांच्या सुरक्षेसाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना किटकनाशकांचे वितरण करण्यात आले आहे.

रोगराईला लगाम : दोन प्रकारच्या कीटकनाशकांचे वितरण गोंदिया : रोगराईची रोकथाम करून धोक्यात आलेल्या पिकांच्या सुरक्षेसाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना किटकनाशकांचे वितरण करण्यात आले आहे. यात शेतकऱ्यांना दोन प्रकारचे किटकनाशक वितरीत करण्यात आले असून आठ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातील काही किटकनाशक अनुदानावर तर काही नि:शुल्क देण्यात आले आहे. कधी पाऊस तर कधी उन्ह यामुळे जिल्ह्यातील वातावरण पिकांना कमी व रोगराईंना चांगलेच मानवले. याचा परिणाम असा झाला की, पिकांवर विविध प्रकारच्या रोगराई व किटकांनी आपला हल्ला चढविला होता. रोगराईच्या या हल्यामुळे उत्पादन घटणार असल्याची भितीही निर्माण झाली होती व त्यामुळे शेतकरीही चिंतेत होते. रबीचा हंगाम जसा-तसा गेला मात्र खरिपात चांगले उत्पादन घेऊन स्थिती सावरण्याचा अंदाज शेतकरी बांधून होते. मात्र रोगराईने त्यांच्या या अंदाजावर पाणी फेरण्याचे सावट निर्माण झाले होते. शेतकऱ्यांची ही चिंता दूर करता यावी तसेच रोगराईमुळे उत्पादनावर फटका पडू नये यासाठी कृषी विभागाने किटकनाशक मागविले होते. मागणीनुसार कृषी विभागाकडे क्लोरो पायरीफॉस व वर्टीसिलीयम लेकानी हे दोन प्रकारचे किटकनाशक पाठविण्यात आले होते. कृषी विभागाकडून त्यांचे तालुकानिहाय वितरण करून रोगराईवर रोकथाम करण्यात आली. परिणामी आजघडीला पिकांवरील रोगराई संपुष्टात आली असल्याचेही कृषी विभागाकडून कळले. तर यामुळे उत्पादनात भर पडणार असल्याचा अंदाजही कृषी विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. दमदार पावसाचाही मिळाला फायदा रोगराईच्या निर्मुलनासाठी कृषी विभागाकडून किटकनाशकांचे वितरण करण्यात आले. असे असताना मागच्या आठवड्यात जिल्ह्यात बरसलेल्या दमदार पावसाने पिकांना चांगलाच फायदा मिळाला. या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असतानाच किडींनाही नष्ट केले. सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रात असलेली ही पावसाने धुवून काढली. परिणामी आजघडीला पिक रोगमुक्त झाले असून चांगले उत्पादन मिळणार असल्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. काही दिवसांत एक पाऊस आल्यास तोही फायदेशीर ठरणार आहे. (शहर प्रतिनिधी)