शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

तंमुस पुरस्कार राशीचे वितरण व सत्कार समारंभ

By admin | Updated: February 10, 2017 01:18 IST

जवळच्या खांबी ग्रामपंचायत तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार राशीचे वितरण

बोंडगावदेवी : जवळच्या खांबी ग्रामपंचायत तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार राशीचे वितरण व ग्रामस्थांचा सत्कार समारंभ ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला.अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेंडारकर, सरपंच शारदा खोटेले, उपसरपंच प्रमोद भेंडारकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सीयाराम तांडेकर, माजी तंमुस अध्यक्ष नारायण भेंडारकर, पंचायत समितीचे शाखा अभियंता टी.पी. कचरे, ग्रामसेवक के.टी. तुरकर उपस्थित होते.सर्वप्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व माल्यार्पण करुन सभापती शिवणकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ग्रामपंचायत व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने गावात विविध उपक्रम राबवून गावात सलोख्याचे वातावरण निर्मिती केली. गावातील तंटे गावामध्ये मिटविण्यावर भर देण्यात आला. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीला दोन लाखांच्या पुरस्कार स्वरूपात निधी प्राप्त झाला होता.पुरस्कार राशीमधून गावाच्या प्रारंभी देखणा असा प्रवेशद्वार बांधण्यात आला. गावातील मुली विवाह होऊन बाहेर गावी संसार करीत असलेल्यांना माहेरभेट, ज्यांनी मुलींना जन्म दिला अशांना कन्यारत्न, ज्यांनी व्यसनाला झिडकारले त्यांना व्यसनमुक्ती अशांचा गौरव करण्यात आला. अनाथांना शिष्यवृत्ती तसेच ईयत्ता दहावी व बारावीमध्ये गुणाणुक्रमे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार राशी देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाला माजी सरपंच बसुराज शेंडे, सदस्य सुदेश खोटेले यासह गावातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ग्रामसेवक के.टी. तुरकर यांनी केले. आभार माणिक खोटेले यांनी मानले. (वार्ताहर)