शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी आरोग्य सेवा विस्कळीत

By admin | Updated: September 28, 2015 02:05 IST

सार्वजनिक आरोग्याची सर्वांगिन हमी घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे मंजूर आहेत.

केशोरी : सार्वजनिक आरोग्याची सर्वांगिन हमी घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे मंजूर आहेत. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून येथील एक पद रिक्त आहे. कार्यरत वैद्यकीय अधिकारी रजेवर गेले तर त्याचा सरळ फटका येथील रुग्ण सेवेवर होत असतो. सध्या पोळ्यापासून येथील वैद्यकीय अधिकारी रजेवर गेल्यामुळे तीच स्थिती निर्माण झाली आहे. येथील प्राथमिक केंद्राचा कार्यभार इळदा येथील फिरत्या पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल यांचेवर सोपविण्यात आला आहे. येथील रुग्णांची गर्दी लक्षात घेता त्यांना फिरत्या पथकाकडे दुर्लक्ष करण्याची वेळ आली आहे. परिणामी त्यांना अधिक कामाचा ताण सोसावा लागत आहे. केशोरी येथे ग्रामीण रुग्णालय मंजुरीचा प्रस्ताव अधांतरी असल्याने या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करू पाहात आहे. याकडे जिल्हा आरोग्य प्रशासनाने जातीने लक्ष देऊन त्वरित येथील रिक्त असलेले वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद भरावे, अन्यथा शिवसेना शाखा केशोरीच्या वतीने जनआंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे चेतन दहीकर, सुशील गहाणे, विलास गायकवाड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज गर्दी असते. २०० च्यावर रुग्णांवर औषधोपचार करावा लागत असल्याने येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त ठेवणे म्हणजे जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार असल्याचे दिसून येते.प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत परिसरातील ३३ गावातील जनतेच्या आरोग्याची जबाबदारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे. त्यामुळे येथील सर्व मंजूर पदे भरणे आवश्यक आहे. या ठिकाणी लाखो रुपये खर्च करुन शवविच्छेदनगृह बांधण्यात आले आहे. परंतु त्या शवविच्छेदन गृहाचे आरोग्य केंद्राला हस्तांतरण करण्यात न आल्यामुळे तेही शवविच्छेदनगृह कार्यान्वित झालेले नाही. शवविच्छेदनगृह कार्यान्वित करावे आणि ग्रामीण रुग्णालय मंजुरीचे अधांतरी असलेले प्रस्ताव शासनाकडे पाठवून मंज़ुरी प्राप्त करून घ्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)