शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक बरखास्त करा

By admin | Updated: March 12, 2015 01:13 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर असतानाही गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्याकडून कर्ज वसुलीसाठी सक्तीने जप्तीची कारवाई करीत आहे.

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर असतानाही गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्याकडून कर्ज वसुलीसाठी सक्तीने जप्तीची कारवाई करीत आहे. ही वसुली नियमबाह्य असून शेतकऱ्यांमध्ये भाजप सरकारविरोधी चित्र निर्माण करणारे आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी शासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा उपप्रतिबंधक दिग्विजय अहेर यांच्यामार्फत बुधवारी (दि.११) सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह संबंधितांना देण्यात आले. निवेदनात नमुद केल्यानुसार शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर असताना गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नियमबाह्य पद्धतीने सक्तिची कर्जवसुली व जप्तीची कारवाई करीत आहे. राज्यात राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता असताना या १५ वर्षामध्ये त्यांना शेतक ऱ्यांकडून कर्ज वसुलीची आठवण झाली नाही. मात्र भाजपची सत्ता येताच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपला बदनाम करण्याकरीता वसुली करुन भाजप सरकार शेतकरीविरोधी असल्याचे चित्र उभे केले जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला.वास्तविक नियमाप्रमाणे कर्जाच्या वसुलीकरीता जप्ती करावयाची असल्यास रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेटची आवश्यकता असते. तसेच जप्तीची कारवाई करण्याआधी नियमाप्रमाणे परिशिष्ठ ३ प्रमाणे नोटीस दिली जाते व जिल्हा उपनिबंधकांकडे त्याची रितसर सुनावनी घेऊन शेतकऱ्याला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाते. मात्र प्रत्यक्षात अशी कुठलीही प्रक्रिया न करता जीडीसीसी बँक शेतकऱ्यांच्या जिवावरच उठली असल्याचा आरोप करण्यात आला. सध्या बँकेचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांकडे जावून वसुलीकरीता शेतकऱ्यासह त्यांच्या कुटुंबाशी अभद्र व्यवहार करीत आहेत. त्यामुळे बँकेद्वारे सुरु असलेली सक्तिची वसुली त्वरीत थांबविण्यात यावी व शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा. अन्यथा भाजप आंदोलनाची भूमिका घेईल, असा इशारा देण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी)