शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी तलावाला घाण व दुर्गंधीचा विळखा

By admin | Updated: January 18, 2015 22:46 IST

शहराच्या मध्यभागी असलेल्या सरकारी तलावाला घाण व दुर्गंधीने विळखा घातला आहे. आजघडीला हा तलाव कचरा टाकण्याचे ठिकाण व परिसरातील नागरिकांचे शौचास बसण्याचे केंद्र बनला आहे.

गोंदिया : शहराच्या मध्यभागी असलेल्या सरकारी तलावाला घाण व दुर्गंधीने विळखा घातला आहे. आजघडीला हा तलाव कचरा टाकण्याचे ठिकाण व परिसरातील नागरिकांचे शौचास बसण्याचे केंद्र बनला आहे. त्यातच शहरातील सांडपाणीही जात असल्याने दुर्गंधीचा जोर वाढतच चालला आहे. यामुळे तलावाच्या पाण्याची दुर्गंधी येत असून याचा त्रास तलावाच्या सभोवताल असलेल्या कुटुंब तसेच परिसरातील व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. मात्र याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष असून नागरिकही स्वत:ची सामाजिक जबाबदारी विसरले असल्याचे दिसून येत आहे. सरकारी तलावामुळे जमिनीतील पाण्याचे स्तर वाढण्यास मदत होत आहे. असे असताना मात्र या तलावाचे आता हाल होऊ लागले आहेत. तलावात सांडपाणी जात असल्याने तलावाचे पाणी खराब झाले आहे. शिवाय यातून दुर्गंध पसरत असल्याने येथील नागरिकही यापासून त्रस्त झाले आहे. येथे पसरलेल्या घाणीमुळे डुकरांचा वावर वाढला आहे. या तलावाच्या काठावरच हनुमानाचे मंदिर आहे. परिसरातील रहिवासी या मंदिरात विविध सण व उत्सव साजरा करीत असल्याने नेहमीच येथे रेलचेल असते. तर जवळच दरगा असल्याने तेथेही मोठ्या प्रमाणात भाविकांची ये-जा सुरू असते. शिवाय सरकारी तलावाचा हा भाग बाजार भागाशी जुळलेला असल्याने मोठ्या प्रमाणात दुकाने ही येथे आहेत. अशात तलावातील दुर्गंधीमुळे व्यापाऱ्यांनाही नाक दाबबन बसावे लागत आहे. शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने तलावाचे पाणी चांगले असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र तलावातील पाणी घाण झाल्यामुळे यावर त्वरित उपाययोजनेची गरज आहे. या तलावाच्या बाजूने अंडरग्राऊंड मार्ग जातो. या रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यांतून तलावाचे पाणी वाहत असल्याने येथून ये-जा करणाऱ्यांनाही याची झळ सहन करावी लागते. शहराची धरोहर असलेल्या या सरकारी तलावाची योग्यरीत्या जोपासना व सौंदर्यीकरण केल्यास एक आकर्षक स्थळ गोंदियावासीयांना लाभ शकते. मात्र प्रशासनाची उदासीनता या तलावाच्या विकासाच्या आडी येत आहे. परिणामी सरकारी तलाव आपले अस्तित्व गमावू लागला आहे. शिवाय मानवाच्या अतिरेकामुळे तलावात घाण पसरत असून आज परिसरातील नागरिकांना हा तलाव नकोसा होऊ लागला आहे. (शहर प्रतिनिधी)