शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

­धानपिकावर गादमाशी, तुडतुड्यासारख्या रोगांचा प्रहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 05:00 IST

या परिसरातील शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सोयी उपलब्ध असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वत:च्या दैनंदिन उपयोगासाठी उच्च प्रतीच्या धानाची लागवड केली आहे. ते धान सध्या निसवत असून, त्यावरही कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. महागड्या किटकनाशकाची फवारणी करून सुद्धा धानावरील रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. याचा परिणाम धानपिकावर होईल.

वामन लांजेवारलोकमत न्यूज नेटवर्कशेंडा कोयलारी :  या परिसरात रोवणीच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली होती. त्यामुळे, धानपिकावर कोरड्या दुष्काळाचे सावट होते. नंतर अतिवृष्टीचा कहर झाल्याने हलक्या प्रतीच्या धानाला व मुख्यत्वे करून हायब्रीडला गादमाशीने ग्रासले आहे. परिणामी धानपीक धोक्यात आले असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे काही हलक्या प्रतीच्या धानावर तुडतुड्यांचा प्रकोप दिसून येत आहे. किटकनाशकाची फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा, मसरामटोला, आपकारीटोला, कोहळीपार, पांढरवाणी, कोयलारी, मोहघाटा, उशिखेडा, कन्हारपायली, पाटीलटोला, सालईटोला, प्रधानटोला, नरेटीटोला व पुतळी हा आदिवासीबहुल परिसर असून, या परिसरात शेती हाच या भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. सध्या हलक्या प्रतीचे धान निसवले असून, अवघ्या काही दिवसांतच कापणीयोग्य होणार आहे. मात्र पाऊस दररोज बरसत असल्याने आणि ढगाळ वातावरणाने धान पिकावर मावा, तुडतुडा, गादमाशी, खोडकिडासारख्या कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे धानपीक धोक्यात आले आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे.

जड धानावरही संकट - या परिसरातील शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सोयी उपलब्ध असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वत:च्या दैनंदिन उपयोगासाठी उच्च प्रतीच्या धानाची लागवड केली आहे. ते धान सध्या निसवत असून, त्यावरही कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. महागड्या किटकनाशकाची फवारणी करून सुद्धा धानावरील रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. याचा परिणाम धानपिकावर होईल. परिणामी, यावर्षीच्या खरीप हंगामातील धान उत्पादनात कमालीची घट होणार असून, शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांना कर्जफेडीची चिंता- यावर्षी बँकेने बहुतांश शेतकऱ्यांना पीक कर्ज देणे नाकारल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. काहींनी उधार उसने करुन धानपिकाची लागवड केली, तेही रोगांच्या प्रादुर्भावाने धोक्यात आले आहे. त्यामुळे परतफेडीचा प्रश्नही शेतकऱ्यांना भेडसावत आहे. शेती व्यवसायाला जोड म्हणून या परिसरात एखाद्या छोट्यामोठ्या उद्योग धंद्याची नितांत गरज आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने विचार करून लक्ष देण्याची गरज आहे.

 

टॅग्स :agricultureशेती