शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक समितीची शिक्षण सभापतींशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 22:36 IST

चिमुकल्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी शाळा सकाळपाळीत लावल्या जाते. परंतु यंदा विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके खावेच लागणार अशी व्यवस्था प्राथमिक शिक्षण विभागाने केली आहे. सकाळ पाळीच्या नावावर सुरू केलेली शाळा आता दुपारी १२.१५ वाजता सुटत असल्याने विद्यार्थ्यांना भर उन्हात आपल्या घरी जावे लागणार आहे.

ठळक मुद्देसकाळची शाळा उन्हात सोडतात : शिक्षक समितीचा आंदोलनाचा इशारा

आॅनलाईन लोकमतगोंदिया : चिमुकल्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी शाळा सकाळपाळीत लावल्या जाते. परंतु यंदा विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके खावेच लागणार अशी व्यवस्था प्राथमिक शिक्षण विभागाने केली आहे. सकाळ पाळीच्या नावावर सुरू केलेली शाळा आता दुपारी १२.१५ वाजता सुटत असल्याने विद्यार्थ्यांना भर उन्हात आपल्या घरी जावे लागणार आहे. या मुद्याला घेऊन महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण सभापती रमेश अंबुले यांच्याशी चर्चा केली.जिल्हा परिषदेच्या १०६५ शाळांत दोन लाखांवर विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. आता उन्हाळ्याला सुरूवात झाल्याने जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी जिल्हा परिषद शिक्षण व क्रीडा समितीने १५ मार्च रोजी झालेल्या मासीक सभेत २१ मार्चपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळपाळीत सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २१ मार्च पासून सकाळ पाळीत शाळा सुरू करण्यात आली. परंतु सकाळी ७.१५ ते दुपारी १२.१५ ही वेळ ठरविण्यात आल्याने विद्यार्थ्यांना उन्हातान्हात शाळेबाहेर पडावे लागते.चिमुकल्या विद्यार्थ्यांना उन्हात बाहेर पडणे ही बाब कुणालाही पटणारी असल्याने महाराष्टÑ शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षीत, सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे, उपाध्यक्ष किशोर डोंगरवार, सहसचिव संदीप तिडके व इतर पदाधिकाºयांनी शिक्षण सभापतींची भेट घेऊन चर्चा केली. सोबत शिक्षण विभागातील विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व सदस्याांनी या चर्चेत सहभाग घेतला होता.यावेळी शिक्षण सभापती रमेश अंबुले यांनी अधिकाºयांशी चर्चा करून वेळेसंदर्भात तोडगा काढू असे शिक्षकांना आश्वासन दिले.