गोंदिया : येथील लोकांना सकाळी फिरण्याकरिता असलेल्या एकमेव सुभाष बागेच्या सौंदर्यीकरणाचा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून रखडलेला होता. सदर समस्या मार्गी लावण्यासाठी बुधवारी २८ आॅक्टोबरला सकाळी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या मार्गदर्शनात नगरसेवक शिव शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत बगिच्यात येणाऱ्या नागरिकांसोबत बगिच्याच्या सौंदर्यीकरण आणि स्वच्छतेसह इतर बाबींवर चर्चा करण्यात आली. तसेच सुधारणेसंदर्भात नागरिकांच्या कल्पना व सूचना नोंद करून एक समिती नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. दर रविवारी नगरसेवक, न.प. प्रशासन व उपस्थित नागरिकांच्या सहकार्याने श्रमदान करून स्वच्छतेचा प्रश्न निकाली काढण्यात येणार आहे. सभेत नगरसेवक शिव शर्मा, अभय अग्रवाल, रंजित असाटी, दिनेश जयपुरिया, सुरेश जैन, पप्पू अग्रवाल, वठेजाजी, निरंजन अग्रवाल, प्रशांत मुंदडा आदी उपस्थित होते.
सुभाष बागेच्या कायाकल्पासाठी नगराध्यक्षाच्या उपस्थितीत चर्चा
By admin | Updated: October 30, 2015 02:04 IST