शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

आमसभेत प्रधानमंत्री आवास योजना ठरली चर्चेचा विषय

By admin | Updated: May 11, 2017 00:21 IST

स्थानिक पंचायत समिती तिरोडा येथे आमदार विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा नुकतीच पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्क तिरोडा : स्थानिक पंचायत समिती तिरोडा येथे आमदार विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा नुकतीच पार पडली. यात प्रधानमंत्री आवास योजना चर्चेचा विषय ठरली. सभेच्या सुरुवातीला मागील वर्षातील केलेल्या कार्यवाहीचा आढवा आमदार महोदयांनी घेतला. चालू वर्षामध्ये शिक्षण विभागामध्ये सद्यस्थितीत केंद्रीय बोर्डाच्या शाळेमध्ये अवाढव्य घेण्यात येणाऱ्या शुल्कावर आळा घालण्याचे निर्देश दिले. तसेच तालुक्यात सद्यस्थितीत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी संबंधित यंत्रणेनी सज्ज राहण्याचे आदेश दिले. त्यानंतर इंदोरा (खुर्द) येथे झालेल्या परिचर भरतीसंबंधी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला असून खंडविकास अधिकारी यांनी चौकशी करण्याचे निर्देश दिले. तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये खूप मोठी तफावत आढळून आली. या आवास योजनेमध्ये नवीन नाम समाविष्ट करण्याकरिता कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता ज्यांच्याकडे निवासाकरिता पक्के घर नसेल अशा लोकांना प्रथम प्राधान्य देवून प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये त्यांचे नाव समाविष्ट करण्यास सूचित केले. तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी नजर ठेवूनही जर काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्यास त्याची तक्रार वरिष्ठांकडे करावी, अशाप्रकारे एकंदर सर्वच विभागाकडून अहवाल सादर करण्यात आला असून आमसभा शांततेत पार पडली. सभेला भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, जि.प. सदस्य रजनी कुंभरे, वीणा बिसेन, पं.स. सभापती उषा किंदरले, उपसभापती किशोर पारधी, पं.स. सदस्य डॉ.बी.एस. रहांगडाले, पवन पटले, रमणीक सयाम, मनोहर राऊत, नत्थू अंबुले, माया भगत, संध्या गजभिये, जया धावडे, निता रहांगडाले, खंडविकास अधिकारी एच.एस. मानकर, दुबे, ना.त. कुंभरे, गटविकास अधिकारी मांढरे, तालुका कृषी अधिकारी पोटदुखे, विवेक ढोरे तसेच सरपंच व सचिव उपस्थित होते.