शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 01:10 IST

अधिकाऱ्यांचे आश्वासन : महासंघाने केले आदोलन स्थगितलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) तर्फे ग्रामपंचयात कर्मचाºयांच्या विविध मागण्यांना घेऊन पंचायत समित्यावर जिल्हा व्यापी आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते. मात्र अर्जुनी-मोरगावचे खंड विकास अधिकारी नारायण जमईवार यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून लेखी आश्वासन दिले.अनेक कर्मचाºयांचे ...

अधिकाऱ्यांचे आश्वासन : महासंघाने केले आदोलन स्थगितलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) तर्फे ग्रामपंचयात कर्मचाºयांच्या विविध मागण्यांना घेऊन पंचायत समित्यावर जिल्हा व्यापी आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते. मात्र अर्जुनी-मोरगावचे खंड विकास अधिकारी नारायण जमईवार यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून लेखी आश्वासन दिले.अनेक कर्मचाºयांचे थकीत वेतन व भत्ता त्वरीत अदा करा, नियमाप्रमाणे वेतन भत्याच्या एकूण रकमेवर दरमहा ८.३३ टक्के भविष्य निर्वाह निधी जमा करा, सर्व सेवा शर्तीची अंमलबजावणी करा व यासाठी जबाबदार अधिकाºयांवर कार्यवाही करा, कर वसुली करीता केवळ कर्मचाऱ्यांना जबाबदार ठरवून अनुदानात कपात करणे व नियमाप्रमाणे ग्रामसेवक व सरपंचावर कार्यवाही करण्याचे टाळणे बंद करा व इतर माण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र आंदोलना पुर्वी खंड विकास अधिकारी जमईवार यांनी पंचायत समिती सभागृहात महासंघाचे प्रतिनिधी, ग्रामसेवक युनियन, सहायक खंड विकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांची संयुक्त सभा घेऊन वरील प्रश्नांवर त्वरीत कार्यवाही करण्याचे लेखी कार्यवृत्त करुन त्वरीत कार्यवाही करण्याचे आदेश दिल्यानंतर पुढील आंदोलनाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला.या चर्चेत मिलींद गणवीर, रविंद्र निसार, सुनिल गणविर, रामु सोनवाने, विठ्ठल सहारे, लोमेश गहाणे, मोरेश्वर सांगोळे व देवानंद दुरुगकर यांनी भाग घेतला. त्याचप्रकारे सालेकसा पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी खाडे यांनीही बैठक घेऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या चर्चेत महासंघाचे मुन्नालाल ठाकरे, टेकचंद चौधरी, राजेंद्र हटेले, कमलेश टेंभुर्णीकर, मनोहर मेश्राम, उमेद चौरे, सूरजलाल मोहारे यांनी भाग घेतला. समाधानकारक चर्चा झाल्याने पुढील आंदोलन स्थगित करण्यात आले.