शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

वीज कामगारांच्या मागण्यांवर चर्चा

By admin | Updated: October 25, 2015 01:45 IST

विदर्भ राष्ट्रीय इलेक्ट्रीकल वर्कर्स युनियनच्या गोंदिया व भंडारा पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण व चर्चासत्र शुक्रवारी पार पडले.

प्रशिक्षण व चर्चासत्र : गोंदिया-भंडारातील पदाधिकाऱ्यांचा सहभाग गोंदिया : विदर्भ राष्ट्रीय इलेक्ट्रीकल वर्कर्स युनियनच्या गोंदिया व भंडारा पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण व चर्चासत्र शुक्रवारी पार पडले. यामध्ये वीज कामगारांच्या विविध मागण्यांवर प्रकाश घालून त्यावर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन विदर्भ राष्ट्रीय इलेक्ट्रीकल वर्कर्स युनियनचे महासचिव एस.वाय.खेवले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी वीज कामगार फेडरेशनचे केंद्रीय उपाध्यक्ष ल.की.टिचकुले होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सल्लागार गणेश रावते, सचिव क्षिरसागर, केंद्रीय प्रतिनिधी सुभाष सेलुकर, सहसचिव दिगंबर कटरे, भंडारा जिल्हाध्यक्ष श्याम वंजारी, केंद्रीय सदस्य हेमंत मोटघरे, विनोज लांजेवार, महिला प्रतिनिधी रंजना उपवंशी, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पंधरप्पा हंस व गडचिरोली जिल्हाध्यक्ष ए.पी.टेंभूर्णीकर उपस्थित होते. याप्रसंगी सहसचिव कटरे यांनी, यंत्रचालकांवरील अन्याय दूर करण्यासाठी व्यवस्थापनाने त्वरीत तोडगा काढावा, उपकेंद्र सहायक व विद्युत सहयकांना पूर्ण भत्ते व क्वार्टर उपलब्ध करवून द्यावे, तांत्रीक व अतांत्रीक कर्मचाऱ्यांना अतिरीक्त कामाचा मोबदला द्यावा, वसुलीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण द्यावे, तक्रार निवारण समितीच्या सभा विभागीय/ प्रविभागीय स्तरावर दर तीन महिन्यांनी घेण्याचे निर्देश असून सुद्धा काही ठिकाणी दोन-दोन वर्षे सभा घेण्यात येत नाही. अशा सर्व विभाग/प्रविभागांचा अहवाल मागवून संबंधितांवर कार्यवाही करण्यात यावी यासह अन्य मागण्यांवर प्रकाश घालून त्यावर चर्चा करण्यात आली. तसेच या मागण्या निकाली काढण्याच्या दृष्टीने मुंबई मुख्य कार्यालयात बैठक लावून कामगारांचे ज्वलंत प्रश्न निकाली काढावे अशी मागणी केली. खेवले यांनी, कामगारांनी घेण्याच्या सुरक्षा व उपाययोजना यावर सखोल मार्गदर्शन तसेच चर्चा करीत अपघात विरहीत सेवा देण्याचे आवाहन केले. टिचकुले यांनी, लेका विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी व उपाययोजनांवर मार्गदर्शनपर प्रशिक्षण दिले. रावते यांनी, सर्व मागण्यांचे समर्थन करीत मागण्यां संबंधात मुख्य कार्यालय स्तरावर व्यवस्थापनाशी चर्चा केली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सहा महत्वाचे प्रस्ताव पारीत करण्यात आले व त्याची प्रत कंपनीचे मुख्य कार्यालय व संघटनेच्या मुख्य कार्यालयाला पाठविण्यात आले. संचालन विश्वजीत मेंढे यांनी केले. आभार अशोक क्षिरसागर यांनी मानले. कार्यक्रमासाठी निलेश बारेवार, कन्हैया वगारे, नरेंद्र पर्वते, विनोद मते, प्रवीण भागवत, धनलाल तिलगामे, विजय वराडे, चंद्रभान झिंगरे, अशोक कोडवते, सी.एम.बागडे, सुभाष शेंडे, उमेश कुथे, ए.के.देशमुख, घनश्याम शेंडे, वाय.के.चुटे, डी.बी.बुद्धे, व्ही.एम.बेलसरे, एम.आर.ईसाळ, एस.एस.चकाटे, अनिल पारधी, पुंडलीक कापगते, रवी ढमढेरे, जी.एन.चौधरी, जीवन कावळे, सचीन राठोड, ईश्वरदास चव्हाण, ज्योती रेवतकर, एस.जे.मेश्राम, रंजू आतीलकर यांच्यासह विदर्भ राष्ट्रीय इलेक्ट्रीकल युनियनच्या सदस्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)