शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

तिन्ही हंगामांत पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना परावृत्त करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:12 IST

गोंदिया : तालुक्यात असलेल्या सिंचन व्यवस्थेचा योग्य व्यवस्थापन व वापर केला गेला, तर तालुक्यात वर्षात खरीप, रबी व उन्हाळी ...

गोंदिया : तालुक्यात असलेल्या सिंचन व्यवस्थेचा योग्य व्यवस्थापन व वापर केला गेला, तर तालुक्यात वर्षात खरीप, रबी व उन्हाळी अशा तिन्ही हंगामांत शेती केली जाऊ शकते. यासाठी पाटबंधारे विभागाच्या मदतीने प्रायोगिक तत्त्वावर काही गावांची निवड करून शेतकऱ्यांना मुबलक पाणी आणि योग्य मार्गदर्शन करीत तिन्ही हंगामांत शेती करण्यास परावृत्त करा, असा सल्ला आ. विनोद अग्रवाल यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

गोंदिया तालुक्याची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक नुकतीच कृषी विभागाच्या कार्यालयात पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपविभागीय कृषी अधिकारी पी.पाटील, तालुका कृषी अधिकारी डी. एम. तुमडाम, कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. एम. एस. देशमुख, राजू माथुरकर, गोंदिया वीज वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता अमोल जयस्वाल, मनोज खोटेले, आर. के. कटरे, बाघ इटियाडोहचे उपविभागीय अभियंता व्ही.व्ही. निगम, महाबीजचे प्रतिनिधी ए.एन. गावंडे, पी.व्ही. कलेवार, डब्ल्यू. टेंभुर्णे उपस्थित होते. आ. अग्रवाल म्हणाले रबी पिकात धानव्यतिरिक्त कलिंगड, खरबूज, लाखोळी, तूर, पोपट, जवस, उडीद, हरभरा, वटणा, इत्यादी पिकांचा, तर उन्हाळी पिकात तीळ, करडई, मूग, उडीद आदींचा समावेश करून शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण तालुक्यात याचे प्रात्यक्षिक करण्याची नावीन्यपूर्ण संकल्पना सुचविली. कृषी अधिकारी तुमडाम यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत काही गावांची निवड करून प्रयोग करण्याचे आश्वासन दिले.

.....

५५०० मेट्रिक टन युरियाची मागणी

दरवर्षी खते आणि बियाणांचा तुटवडा जाणवत असल्याने शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून नियोजन करून खरिपासाठी आवश्यक बियाणे व खते आधीच उपलब्ध करून ठेवण्याचे निर्देश आमदार विनोद अग्रवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. खरिपासाठी धानाचे महाबीजकडे ५५०० क्विंटल, तर खाजगी कंपनीचे ५००० क्विंटल, अशी एकूण १०५०० क्विंटल मागणी केली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली, तर खतांसाठी ५५०० मेट्रिक टन युरिया, तर १६७२६ मेट्रिक टन इतर खतांची मागणी केली आहे.

........

जैविक खतांचा वापर करणाऱ्यावर भर द्या

धान पिकावर सर्वाधिक मावा, तुडतुडा, पतंगा अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. यावर उपाय म्हणून रासायनिक उपचारापेक्षा जैविक उपचार जास्त उपयुक्त असून, यासाठी कामगंध सापळा, निंबोळी अर्क, मेटारायझियम, ट्रायकोकार्ड व जैविक कीटकनाशकांचा वापर सोयीस्कर असल्याचे यांच्या वापरातून निदर्शनात आले आहे, तसेच शेतकऱ्यांना कीड नियंत्रणावर उपाययोजना कशी करता येईल यासाठी वेळोवेळी पत्रकार परिषद, प्रेस नोट, पत्रके यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रोग नियंत्रण करण्यासंबंधीच्या सूचना करण्यात आल्या.