खबरदारी घ्या : राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने दिली माहितीगोंदिया : वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तीच्या काळात नागरिकांनी कोणत्या प्रकारची खबरदारी घेऊन आपत्ती व्यवस्थापन कशाप्रकारे करावे, याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात नॅशनल डिझास्टर रिस्पाँस फोर्सच्या (एनडीआरएफ) तळेगाव (पुणे) येथील अधिकाऱ्यांनी कार्यशाळेत दिली. कार्यशाळेला जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर व पोलीस अधिकारी व एनडीआरएफचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.कोणतीही आपत्ती सांगून येत नसल्यामुळे संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने सक्षम असले पाहिजे. आपत्तीच्या काळात तसेच जपानमध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी आणि नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाच्या काळात एनडीआरएफच्या चमूने कशाप्रकारे मदत केली, याबाबतची माहिती या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.भूकंप, पूर परिस्थिती, चक्रीवादळ, क्लोरिन वायुगळती, ज्वालामुखीचा उद्रेक या आपत्तीच्या काळात मदत व बचाव करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारची भूमिका बजावावी लागत असल्याचे दत्त यांनी या वेळी सांगितले.पूर परिस्थितीच्या काळात पूर येण्यापूर्वी बचाव कार्य करण्यात येते. याबाबतची चित्रफीत या वेळी दाखविण्यात आली. प्रशिक्षण कार्यशाळेला जिल्हा बचाव पथक, तालुका बचाव पथकातील सदस्य, व्हाईट आर्मीचे सदस्य, पोलीस, गृहरक्षक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा
By admin | Updated: September 5, 2015 02:22 IST