शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रोखपालाच्या अनुपस्थितीत खातेदारांची गैरसोय

By admin | Updated: May 14, 2014 01:41 IST

येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत कर्मचाऱ्याच्या अभावामुळे खातेदारांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे.

कालीमाटी : येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत कर्मचार्‍यांच्या अभावामुळे खातेदारांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे.

कालीमाटी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत कर्मचार्‍यांचा अभाव तसेच रोखपालांच्या नेहमीच्या अनुपस्थितीमुळे ग्राहकांना बँक व्यवहारात दिरंगाई होत आहे. कालीमाटी येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची शाखा आहे. या शाखांतर्गत सहा हजारावर खातेदार आहेत. हजारोवर खातेदारांना सेवेसाठी फक्त दोन अधिकारी देण्यात आले. याठिकाणी शेकडो खातेदार दैनिक कामासाठी येतात. पण त्यांना वेळेवर व्यवहार करता येत नसल्याकारणाने ग्राहकांत बँकेविरुद्ध रोष दिसून येत आहे.

याठिकाणी बचत खाते, ठेवीदार, खाते उघडण्यासंबंधी, शिष्यवृत्ती, रोहयोचे मजूर, निराधार लाभार्थी, कर्ज आदी कार्यासाठी शेकडो खातेदार दररोज येतात. त्यांना तासन्तास ताटकळत राहावे लागते. सदर बँकेत शाखा व्यवस्थापक, रोखपाल स्थायी आहेत. पण रोखपाल रमेश शेंडे अपवाद आहेत. ते नेहमी अनुपस्थित असतात. त्यामुळे रोख व्यवहारात ग्राहकांची गैरसोय होत असल्याची ओरड गावकर्‍यांत आहे.

१२ मे रोजी रोखपाल शेंडे पुन्हा गैरहजर होते. सकाळी ११.३३ मिनिटापर्यंंंत शाखेत फक्त रोजंदारी कर्मचारी मानकर बँक व्यवहार पार पाडत होते. काही वेळात शाखा व्यवस्थापक बी.एम. मिश्रा आल्यावर खातेदारांचे आर्थिक व्यवहार करण्यात आले. याठिकाणी कर्मचार्‍यांची गरज असून सक्षम रोखपाल, लिपिक, परिचर आदींची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या बँकेत पेन्शनधारक, अपंग, विधवा महिला, वृद्ध पुरुष-महिला विविध शासनाच्या योजनेतून लाभ मिळतो पण त्यांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. सदर बँकेत नेहमीच सावळागोंधळ सुरू असते. या प्रकरणी वरिष्ठांनी विराम आणून बँकसेवा सुरळीत करावी, अशी मागणी कृष्णा चुटे, मंगल फुंडे, पुरुषोत्तम हरिणखेडे, जयप्रकाश मेंढे, भोजू ूगिर्‍हेपुंजे, लीलाधर गिर्‍हेपुंजे, पुरुषोत्तम टेंभरे, भोजू बहेकार, हेमराज फुंडे आदींनी केली आहे. (वार्ताहर)