शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सौंदड धान खरेदी केंद्रांवर गैरसोय

By admin | Updated: November 9, 2016 01:47 IST

केंद्र शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्र हंगाम २०१६-१७ करीता सडक अर्जुनी तालुक्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत सौंदड,

सुख-सुविधांचा अभाव : १६ गावांतील शेतकऱ्यांची लूट थांबवा -अशोक लंजे सौंदड : केंद्र शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्र हंगाम २०१६-१७ करीता सडक अर्जुनी तालुक्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत सौंदड, बाम्हणी, हेटी, मुरपार, धानोरी, पांढरी येथे तसेच उपप्रादेशिक कार्यालय आदिवासी विभाग नवेगावबांध यांच्या सेवा सहकारी आदिवासी संस्थांमार्फत कनेरी, चिखली, कोहमारा, सडक अर्जुनी, परसोडी, डव्वा, खजरी, दल्ली, डोंगरगाव, कोयलारी या केंद्रावर शासनाच्या आधारभूत धान धरेदी केंद्र सुरु करण्यात आले. मात्र या केंद्रांवर शेतकऱ्यांसाठी योग्य सुविधा नाही. त्या सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांची लूट थांबवावी अशी मागणी जि.प.चे माजी कृषी सभापती अशोक लंजे यांनी केली आहे.या धान्य खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करताना ईलेक्ट्रानिक वजन काटे उपयोगात आणायला हवे, परंतु जुने साधे काटे (वजन माप) नुतनीकरण न करताच सर्रासपणे शेतकऱ्यांचे धान जास्त प्रमाणात मोजल्या जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात शासन दरापेक्षा कमी दराने धान्य शेतकऱ्याने व्यापाऱ्यास विकू नये याची खबरदारी घेणे बाजार समितीची आहे. परंतु सर्रासपणे सडक अर्जुनी तालुक्यात व्यापारी शेतकऱ्यांकडून शासनाच्या समर्थन मुल्यापेक्षा कमीदराने खऱ्यावरच धान्य खरेदी करीत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.सडक अर्जुनी तालुक्यातील जिल्हा मार्केटिंग गोंदिया व आदिवासी विभाग नवेगावबांध यांच्यामार्फत चालविण्यात येणाऱ्या धान्य केंद्रावर धान्य खरेदीवर शासनाचा ग्रेडर दिसून येत नाही. या केंद्राच्या माध्यमातून बाजार समितीला १ रु.५ पैसे शेष रुपाने मिळते. जवळपास सडक अर्जुनी बाजार समितीला वर्षापोटी २५ लाख पर्यंत उत्पन्न होते. परंतु या शेषच्या उत्पन्नातून प्रत्येक केंद्रावर बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी बसण्याची व्यवस्था, टोकण देणे, शेड, आद्रतामापक यंत्र, माहिती फलक, पिण्याचे पाणी व केंद्राशी जोडलेले गाव यादी, इत्यादी व्यवस्था करुन देणे शासन निर्णयानुसार करुन देणे बंधनकारक आहे. बहुतांश केंद्रावर ही सुविधा दिसून येत नाही. त्यामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्याकरिता सुख-सुविधेचा अभाव असून शेतकरी हवालदिल झाला आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे माजी सभापती अशोक लंजे यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)