शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

करुझरी सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 22:07 IST

तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त संपूर्ण आदिवासी गाव करुझरी गावात ये-जा करण्याकरीता रस्ता नसल्याने हे गाव सोयी सुविधांपासून वंचित आहे. मात्र शासन आणि प्रशासनाने अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे गावकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्दे६५ वर्षानंतरी रस्त्याची सोय नाही : शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष, गावकऱ्यांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त संपूर्ण आदिवासी गाव करुझरी गावात ये-जा करण्याकरीता रस्ता नसल्याने हे गाव सोयी सुविधांपासून वंचित आहे. मात्र शासन आणि प्रशासनाने अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे गावकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.प्राप्त माहितीनुसार, गट ग्रामपंचायत पळसगाव (चुटिया) अंतर्गत येणाºया करुझरी गावाला ये-जा करण्यासाठी अद्यापही रस्ता नाही. एकीकडे शासन पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत ग्रामीण भागात रस्त्याचे जाळे तयार करण्याचा दावा करीत आहे. तर दुसरीकडे स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही करुझरी गाव रस्त्याच्या सुविधेपासून वंचित आहे. दरम्यान याची दखल घेत काँग्रेस कमिटीचे महासचिव सहसराम कोरोटे यांनी करुझरी येथे भेट देवून गावातील समस्यांची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत पळसगावचे सरपंच फुलवंता बागडेरीया, माजी पं.स. सदस्य व धुर्व गोंड समाजाचे अध्यक्ष सोनू नेताम, माजी सभापती वसंत पुराम, उमेश बागडेरीया, धुरसिंग मडावी, ममता कुंभरे, रामहरी नेताम, नामदेव भोयर, रामदास सलामे, मदनलाल ताराम, शामलाल कुंभरे, मंगलू कुंजाम, शिवलाल मडावी, पोलीस पाटील चौधरी, ताराचंद चनाप, मन्साराम कुंभरे, महिला धुर्व गोंड समाजाचे अध्यक्ष पुशो ओटी, वच्छला दर्रो, फुलवंता कल्लो व रुकमीनी ताराम उपस्थित होते. याप्रसंगी गावातील लोकांनी गावात जि.प.ची प्राथमिक शाळा आहे. या गावात ये-जा करण्यासाठी केवळ एकच रस्ता असून तो देखील पूर्णपणे अविकसीत आहे. पावसाळ्यात करुझरी नाल्यावरुन पाणी वाहत असल्याने या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटतो. त्यामुळे एखाद्या रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी विविध अडचणीना तोंड द्यावे लागते. येथे पूल तयार करण्यासाठी शासनाने २०१५-१६ या वित्तीय वर्षात ३३ लाख २९ हजार २०० रुपये निधी मंजूर केला होता. या निधीतून या कामावर अकुशल कामे करण्यात आली. यावर २ लाख ५० हजार रुपये खर्चही झाले. मात्र सध्या स्थितीत या पुलाचे काम सुध्दा बंद आहे. याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.सिंचनाच्या सोयीचा अभावकरुझरी येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मात्र सिंचनाच्या सोयींचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. या परिसरात सिंचनाच्या सोयी केल्यास शेतकऱ्यांना त्याची मदत होईल.आंदोलन छेडण्याचा इशाराकरुझरी हे गाव स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे. मात्र शासनाने याची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे या गावातील गैरसोयी दूर करुन हे गाव केव्हा विकासाच्या प्रवाहात येणार असा सवाल सहषराम कोरोटे यांनी शासनाला केला. करुझरी येथे ये-जा करण्यासाठी रस्ता तयार न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोरोटे यांनी दिला आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी