शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

गलिच्छ गोंदियाचा ३४३ वा क्रमांक

By admin | Updated: May 7, 2017 00:13 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ला महाराष्ट्राने काळीमा फासला असतानाच गोंदिया शहराने गलिच्छ शहरांच्या यादीत ३४३ वा क्रमांक गाठला.

स्वच्छता मिशन फसले : पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ला महाराष्ट्राने काळीमा फासला असतानाच गोंदिया शहराने गलिच्छ शहरांच्या यादीत ३४३ वा क्रमांक गाठला. स्वच्छतेसाठी देशपातळीवर सुरू असलेल्या या धडपडीत शहरात मात्र स्वच्छता मिशन फसल्याचे दिसून येत असून यातून नगर पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अवघ्या देशाचे चित्र बदलविण्याचे मानस बाळगून पंतप्रधानांनी ‘स्वच्छ भारत मिशन’ हाती घेतले. नव्यानव्यात सर्वांनाच याचा हुरूप आला होता. मात्र ‘चार दिन चांदनी’ चा प्रकारही या मोहिमेप्रती जाणवला. परिणामी सर्वांनीच हळूहळू या मोहिमेला बगल देत आपली दिनचर्या सुरू ठेवली. हेच कारण आहे की, महाराष्ट्र या मोहिमेत महागलिच्छराष्ट्राच्या किताबाने नवाजल्या गेला. जेथे राज्याच माघारले आहे तेथील गोंदिया शहराची शान काही औरच आहे. चालायला धड रस्ते नसलेल्या या शहराची स्थिती अतीशय भयंकर आहे. त्यात स्वच्छतेचे तीन तेरा वाजल्याचे शहरातील कोणत्याही कोपऱ्यात जावून बघता येते. हेच कारण आहे की, गोंदिया शहराने सर्वेक्षणात ३४३ वा क्रमांक पटकाविला आहे. जेथील नाल्यांची सफाई होत नाही. कचऱ्याचे ढिगार लागून असल्याचे दिसते. डुकरांचा मोकाट वावर अशा शहरापासून अपेक्षा तरी काय करायची अशा प्रतिक्रीयाही आता शहरवासी देत आहेत. सर्वेक्षणातील शेवटच्या टोकावर मिळविलेल्या या क्रमांकावरून शहरातील स्वच्छतेची स्थिती किती गंभीर आहे. तसेच शहरवासी किती भयंकर वातावरणात आपला श्वास घेत आहेत याची जाणीव होते. अशा या गलिच्छ शहरातील नगर पालिकेच्या कारभारावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होतो. गलीच्छ असलेला गोंदिया कधी सुधरणार असा सवाल नागरिक करीत आहेत.