शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनाही डिजिटल करा

By admin | Updated: May 6, 2017 00:55 IST

डिजिटल इंडिया संकल्पनेतून सध्या ई-सुविधेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. यामध्ये शाळांचासुद्धा समावेश करण्यात आला आहे.

विजय रहांगडाले : प्रवेशद्वारे व मूर्ती लोकार्पण कार्यक्रम लोकमत न्यूज नेटवर्क तिरोडा : डिजिटल इंडिया संकल्पनेतून सध्या ई-सुविधेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. यामध्ये शाळांचासुद्धा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात बहुतांश शाळा डिजिटल झालेल्या आहेत. परंतु नुसती शाळा डिजिटल होणे गरजेचे नसून त्याबरोबर विद्यार्थीसुद्धा डिजिटल होणे आवश्यक आहे. याकरिता प्रत्येक शिक्षकाला संगणक हाताळता येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आ. विजय रहांगडाले यांनी केले. तलुक्यातील ग्राम मुंडीपार येथे प्रवेशद्वार व शारदादेवीच्या मूर्ती लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार रहांगडाले यांनी, ई लर्निंगमुळे विद्यार्थी व शिक्षकांच्या वेळेची बचत होते. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याची संकल्पना पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. याकरिता प्रत्येक शिक्षकाने आपल्या अध्यापन कार्यात संगणकाच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचा वापर करावा. विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाविषयी अभिरुची निर्माण करावी असे मत व्यक्त केले. माजी आमदार भजनदास वैद्य यांनी, मराठी ही आपली मातृभाषा असून मराठी भाषेची अस्मिता टिकवून ठेवण्याकरिता विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून शिक्षण देणे गरजेचे आहे असे सांगितले. कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रवेशद्वार व मूर्ती दानदाते सेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष मुन्नीलाल चौधरी, माजी आमदार भजनदास वैद्य, कृउबास मुख्य प्रशासक डॉ. चिंतामन रहांगडाले, प्रशासक डॉ. वसंत भगत, पं.स. सदस्य डॉ.बी.एस. रहांगडाले, गटशिक्षणाधिकारी मानकर, विस्तार अधिकारी समरीत, माजी संचालक प्रभा घरजारे, सरपंच शीला साठवणे, उपसरपंच आनंद उके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबुलाल चौधरी, पोलीस पाटील साठवणे, भाजप महामंत्री डिलेश पारधी, ग्रा.पं. सदस्य सेलोकर, गजभिये, मुख्याध्यापक मनोहर पटले व मोठ्या संख्येने गावकरी, विद्यार्थी उपस्थित होते. संचालन आर.पी. भगत यांनी केले. आभार यू.जे. पारधी यांनी मानले.