शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल साहित्य धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 21:44 IST

सडक-अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत येणारी येथील जिल्हा परिषद शाळा ३० डिसेंबर २०१६ रोजी डिजिटल करण्यात आली होती.

ठळक मुद्देलोकवर्गणी परत करा : शेंडाच्या जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : सडक-अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत येणारी येथील जिल्हा परिषद शाळा ३० डिसेंबर २०१६ रोजी डिजिटल करण्यात आली होती. मात्र हे डिजिटल सयंत्र बंद पडून असल्यामुळे त्यांचा विद्यार्थ्यांना कोणत्याच प्रकारचा लाभ झाला नाही. लोकवर्गणीतून घेण्यात आलेले हे डिजिटल संच धूळ खात पडून असल्याने वर्गणीचे पैसे परत करण्याची मागणी करण्यात आली आहे.जिल्ह्यातील प्रत्येक शाळा डिजिटल करुन त्या माध्यमाने विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देता येईल, असा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. त्यासाठी वरच्या स्तरापासून खालच्या स्तरापर्यंतचे कर्मचारी ही मोहीम राबविण्यात व्यस्त होते. जिल्ह्यातील बहुतांश शाळांचे डिजिटल यंत्र धूळ खात पडून असल्याची माहिती आहे. त्यात येथील जिल्हा परिषद शाळाही मागे नाही. शासन योजना राबविते, परंतु त्याचे परिणाम मात्र यशस्वी होताना दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचे धडे कसे मिळतील, अशी समस्या उभी ठाकली आहे.याच शाळेतील शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेवून लोकवर्गणी गोळा केली. यामध्ये शिक्षकांचाही सहभाग होता. त्याच लोकवर्गणीच्या पैशाने विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी डिजिटल यंत्र खरेदी करण्यात आले. सदर यंत्र दोन-चार महिने चालून बंद पडले. त्यामुळे विद्यार्थ्यांना लाभ मिळाला नाही. यंत्र बंद पडल्यापासून आतापर्यंत त्यांची सुधारणा करण्यात आली नाही. तसेच ते सुरू करून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचे धडे कसे दिले जातील, याबाबत सद्यस्थितीत कुणीही पुढाकार घेतल्याचे दिसून येत नाही.डिजिटल शिक्षणाचा उद्देश समोर ठेवून गावकºयांनी सरळ हाताने वर्गणी दिली होती. मात्र डिजिटल यंत्रच बंद पडून धूळ खात पडले असतील तर जमा केलेली वर्गणी परत करण्यात यावी, असे जितेश मानवटकर व कोमल दामले यांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे.