शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तधनासाठी जंगलात खोदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2016 02:02 IST

नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव जंगलात बोदराईनजीक १० इसमांना नवेगावबांध वनविभागाच्या गस्ती पथकाने मंगळवारला पकडले.

१० आरोपींना अटक : नवेगावच्या राखीव वनात गस्तीपथकाची कारवाई अर्जुनी मोरगाव : नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव जंगलात बोदराईनजीक १० इसमांना नवेगावबांध वनविभागाच्या गस्ती पथकाने मंगळवारला पकडले. या आरोपींनी अनधिकृत प्रवेश केला. मात्र वन्य प्राण्यांची शिकार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, की गुप्तधनाचा शोध याचा तपास सुरू आहे. याप्रकरणी वनविभागाने त्या १० आरोपींना अटक केली. गुरुवारी यापैकी ६ आरोपींची जमानतीवर सुटका केली तर ४ आरोपींची भंडारा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. वनविभागाच्या गस्ती पथकाची जांभळी प्रवेशक्षेत्र ते बोदराई परिसरात मंगळवारी (दि.२०) गस्त सुरू होती. देवदास भिक्षू जनबंधू रा.रामपुरी, निकेश रामचंद्र गजबे रा.भुरसीटोला, करण शालीकराम गजबे रा.पिंडकेपार साकोली, विनोद मनोहर सावसाकडे रा.तिर्री (अड्याळ), किसनराव प्रभाकर टेंभरे रा.हौशंगाबाद (मध्यप्रदेश), मनोजकुमार भीमराव घोरमारे रा.मालेगाव भंडारा, कुंदन मेश्राम, शालीकराम गजबे, ज्ञानेश्वर विश्वनाथ वैद्य व उमेश गजबे सर्व रा.बिडटोला यांनी मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास बोदराई परिसरात प्रवेश केला. याचवेळी गस्तीपथक तिथे जाऊन धडकले. घनदाट जंगलात हे लोक खड्डा खोदण्याचे काम करीत होते. वनकर्मचाऱ्यांना बघून पाच आरोपी पळाले तर पाच आरोपी घटनास्थळावर सापडले. या पाच आरोपींना मंगळवारी अटक करुन बुधवारला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना दोन दिवसांची वनकोठडी मंजूर केलीहोती. बुधवारला पसार झालेल्या पाच आरोपींना अटक करुन गुरुवारला (दि.२२) न्यायालयात हजर करण्यात आले. या सर्व आरोपींवर शस्त्रांसह वनकायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. आरोपीतर्फे अ‍ॅड.मोहन भाजीपाले तर वन विभागातर्फे अ‍ॅड.राजेश पालीवाल यांनी युक्तीवाद केला. (तालुका प्रतिनिधी)मध्यप्रदेशच्या हौशंगाबादचा महाराजजादूटोण्याद्वारे सुमारे दोन कोटी रुपयांचे गुप्तधन काढतो, अशी बतावणी करुन खड्डे खोदण्याचे काम सुरु होते. यासाठी हौशंगाबाद (मध्यप्रदेश)चे किसनराव टेंभरे या महाराजाला पाचारण केले होते. घटनास्थळी दीड बाय दीड फुटाचा खोल खड्डा होता. सभोवताल भगवे झेंडे, जमिनीची देवपूजा, कापलेले निंबू आढळून आले.