शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या कथनी व करणीत फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 21:26 IST

शेतकऱ्यांची हितेशी असल्याचे सांगत असलेल्या सरकारच्या कथनी व करनीत फरक असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त असल्याचा आरोप माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केला.

ठळक मुद्देराजेंद्र जैन : तहसील कार्यालयावर हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : शेतकऱ्यांची हितेशी असल्याचे सांगत असलेल्या सरकारच्या कथनी व करनीत फरक असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त असल्याचा आरोप माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केला.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने २५ डिसेंबरपासून सुरू असलेल्या शेतकरी सन्मान यात्रेचा शनिवारी (दि.३०) समारोप करीत येथील तहसील कार्यालयावरील हल्लाबोल आंदोलनात ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार दिलीप बंसोड, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे, देवेंद्रनाथ चौबे, तालुकाध्यक्ष डॉ.अविनाश काशिवार, जिल्हा बँक संचालक गजानन परशुरामकर, जिल्हा परिषद सदस्य रमेश चुऱ्हे, हिरालाल चव्हाण, आर.टी.शहा, छाया चव्हाण, लक्ष्मण चंद्रिकापुरे, सुरेश हर्षे, मिलन राऊत, रित लांजेवार, शशिकला टेंभूर्णे, देवचंद तरोणे, लक्ष्मण लंजे, रूपविलास कुरसुंगे, मुनीश्वर कापगते, जीवन लंजे, रजनी गिरेपुंजे, रेखा कोसलकर, शिवाजी गहाणे, कृष्णा ठलाल, आनंद इळपाते, पी.यू.रहांगडाले, दिनेश कोरे, छाया मरसकोल्हे, सचिन येसनसुरे, अनिता बांबोळे यांच्यासह मोठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते.याप्रसंगी चंद्रिकापुरे यांनी, शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सरकार गंभीर नाही. त्यामुळेच शेतकरी आज भरडत चालला आहे. मात्र शेतकºयांच्या हितार्थ असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मागण्यांची पूर्तता होत नाही तोवर आम्ही शांत बसणार नाही असे सांगीतले.तहसीलदारांना दिले निवेदन व जेलभरो आंदोलनया आंदोलनांतर्गत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे, पीक विमा योजनेचा लाभ देण्यात यावा, धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या खर्चाच्या प्रमाणात दीड पट भाव द्यावा, मासेमार संस्थांना होणाºया नुकसानीला बघता संस्थांना आर्थिक मदत द्यावी, रोजगार हमी योजनेची कामे त्वरीत सुरू करून शेतकरी व शेतमजुरांना काम उपलब्ध करवून द्या, उस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचे योग्य दर द्यावे, शेतकरी-शेतमजूर व विद्यार्थ्यांना लागणाºया विविध दाखल्यांची अट रद्द करून तलाठ्यांमार्फत दाखले देण्याचे आदेश द्यावे, कृषी पंपांचे बिल सरसकट माफ करावे आदि मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच उपस्थित समस्त पदाधिकारी, कार्यकर्ता व शेतकऱ्यांनी जेलभरो आंदोलनांतर्गत स्वत:ला अटक करवून घेतली.