शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल दरवाढीने महागाईचे चटके बसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 05:00 IST

विशेष म्हणजे, डिझेलच्या दरावरच अन्य वस्तूंचे दर अवलंबून असतात. कारण डिझेलचे दर वधारल्यामुळे मालवाहतुकीचेही दर वधारणार असून त्यानंतर सर्वच वस्तूंचे दर वधारणार आहे. विशेष म्हणजे, या दरवाढीमुळे सर्वसामान्यांची फसगत होणार असतानाच मालवाहतूक करणारे ही यापासून सुटलेले नाहीत. वाढीव भाडे मिळत नसल्याने त्यांना जुन्याच भाड्यावर गाड्या चालवाव्या लागत आहेत. परिणामी हाती येणाऱ्या मिळकतीवर डिझेल दरवाढीने डल्ला मारला आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  रशिया व युक्रेनमधील युद्धाच्या झळा आता बसू लागल्या असून त्याची सुरुवात खाद्यतेल व किराणामालानंतर आता पेट्रोल-डिझेल दरवाढीतून बघावयास मिळत आहे. दिवाळीपासून नियंत्रणात असलेले पेट्रोल-डिझेलचे दर आता एका झटक्यात वधारले असून सर्वसामान्यांची फसगत झाली आहे. विशेष म्हणजे, डिझेलच्या दरावरच अन्य वस्तूंचे दर अवलंबून असतात. कारण डिझेलचे दर वधारल्यामुळे मालवाहतुकीचेही दर वधारणार असून त्यानंतर सर्वच वस्तूंचे दर वधारणार आहे. विशेष म्हणजे, या दरवाढीमुळे सर्वसामान्यांची फसगत होणार असतानाच मालवाहतूक करणारे ही यापासून सुटलेले नाहीत. वाढीव भाडे मिळत नसल्याने त्यांना जुन्याच भाड्यावर गाड्या चालवाव्या लागत आहेत. परिणामी हाती येणाऱ्या मिळकतीवर डिझेल दरवाढीने डल्ला मारला आहे.  

आठवडाभरात डिझेलमध्ये ४ रुपयांची वाढ सध्या डिझेलची दरवाढ दररोज होत असून त्यात एका आठवड्यात डिझेल ४ रुपयांनी बधारल्याचे दिसत आहे. २५ मार्च रोजी डिझेलचे दर ९६.२६ एवढे होते. तर १ एप्रिल रोजी डिझेलचे दर वधारून १००.३६ रुपये झाले. म्हणजेच ४ रुपयांची दरवाढ दिसून येत आहे. विमा महागला पेट्रोल-डिझेलचे दर वधारत चालले असतानाच शासनाने वाहन विम्याचे दर भरमसाट वाढवून दिले आहेत. त्यात अधिकची भर म्हणजे १ एप्रिलपासून त्यात आणखी वाढ होणार असल्याची माहिती आहे. 

वर्षभरात डिझेल १० रुपयांनी महागले डिझेलची दरवाढ मागील वर्षभरापासून सातत्याने सुरूच आहे. १ एप्रिल २०२१ रोजी डिझेल जर ९०.६२ रुपये होते. तेच १ एप्रिल २०२२ रोजी १००.३६ रुपये झाले आहे. म्हणजेच वर्षभरात १० रुपयांची दरवाढ झाली आहे. 

डिझेलचे दर दररोज वाढत चालले असून आम्हाला मात्र वाढीव भाडे मिळत नसल्याने जुन्याच भाड्यावर गाडी चालवावी लागत आहे. परिणामी आम्हाला मिळणाऱा नफाही हातून जात आहे. डिझेलची अशीच दरवाढ होत राहिल्यास आम्हाला गाडी चालविणे आणखी कठीण होणार असून भाडे वाढवावेच लागतील.  - सुनील धवने, अध्यक्ष, मालधक्का लोकल ट्रक असोसिएशन, गोंदिया 

भाववाढीमुळे गणिते बिघडली

डिझेलचे दर वाढत असतानाच आता विमा व फिटनेसचे दर वाढणार आहेत. मात्र भाडे वाढविता येत नसल्याने आमची फसगत होत आहे. आता गाडी चालविणे कठीण होत असून भाडे वाढविण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. - उमेश शिरगरे (ट्रक चालक-मालक)

डिझेलचे दर वाढले असूनही भाडे वाढ करता आली नाही. परिणामी आम्हाला आता गाडी चालविणे कठीण होत आहे. डिझेलची दरवाढ होत राहिल्यास भाडे वाढवावे लागतील व परिणामी महागाई वाढेल. - किशोर शेंडे (ट्रकचालक)

 

टॅग्स :Dieselडिझेल