सुकडी-डाकराम : जवळच्या ठाणेगावात डायरियाचा प्रकोप झाल्यानंतर गावात आरोग्य विभागाने शिबिर लावले. मात्र तिसऱ्या दिवशी पुन्हा ठाणेगावातील १६ लोकांना डायरियाची लक्षणे दिसल्याने सुकडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. याशिवाय सुकडी, पिंडकेपार, डोंगरगांव आणि कोडेलोहारा येथील प्रत्येकी १-१ रुग्ण सुकडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल आहेत.ठाणेगाव येथील राजकुमार कापसे (५०), चित्रागंगा खोब्रागडे (४०), किसन पारधी (६५), नीता खोब्रागडे (३२), समृद्धी बावने (१६), शर्मिला खोब्रागडे (५२) आणि हितेश पटले (४२) यांना ६ मे च्या रात्री तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. सुकडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रामकला पवनकर (५०), यशोदा पवनकर (५५), हुपराज लांजेवार (४५), अनिल शहारे (२७), अशोक सहारे (३६), कचरू मेश्राम (६५), कपील पटले (२०), राकेश खोब्रागडे (२१), तरूणेश खोब्रागडे (३६) आणि प्रविण खोब्रागडे (२१) यांना भरती करण्यात आले. याशिवाय कोडेलोहारा येथील अंजिरा इड़पाते (६५), सुकड़ी येथील नेहा बिसेन (६), डोंगरगांव (खडकी) येथील साहेबराव पटले (४८) आणि पिंड़केपार येथील उमेश्वरी टेहरे (२०) यांना ७ मे रोजी सुकड़ी के प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात भरर्ती करण्यात आले.जिला परिषद उपाध्यक्ष मदन यांनी सुकड़ी आणि ठाणेगाव येथील शिबिराला भेट दिली. त्यांच्यासोबत अतिरिक्त जिला आरोग्य अधिकारी अशोक गहलोत आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सी.आर. टेंभुर्णे उपस्थित होते.
ठाणेगावात डायरियाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ
By admin | Updated: May 8, 2015 00:58 IST