शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धानाला आघाडी सरकारनेच दिली सर्वाधिक भाववाढ

By admin | Updated: June 29, 2015 01:19 IST

आपण शेतकऱ्यांच्या कसे हिताचे आहोत हे दाखविण्याचे नाटक करून केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने शेतकऱ्यांची चक्क दिशाभूल केली आहे.

मोदी सरकारकडून दिशाभूल : राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा घणाघातगोंदिया : आपण शेतकऱ्यांच्या कसे हिताचे आहोत हे दाखविण्याचे नाटक करून केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने शेतकऱ्यांची चक्क दिशाभूल केली आहे. धान उत्पादकांना गेल्या दोन वर्षांपासून फक्त ५० रुपये भाववाढ देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. याउलट आघाडी सरकारच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आपण शेतकऱ्यांच्या धानाला ६० ते १७० रुपयांपर्यंत भाववाढ मिळवून दिली. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित जोपासणारे कोण, आम्ही की, स्वत:ला भूमिपूत्र म्हणविणारे खोटारडे नेते, हे शेतकऱ्यांनीच ठरवावे, असा घणाघात खा.प्रफुल्ल पटेल यांनी केला.‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांची ही व्यथा मांडली. खा.पटेल म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याची आणि शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा जास्त हमीभाव देण्याची ग्वाही देत सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारने सलग दुसऱ्या वर्षीही धानाच्या हमीभावात अवघी ५० रुपये वाढ दिली आहे. गेल्या सहा वर्षातील धानाच्या हमीभावात झालेल्या भाववाढीचा विचार केल्यास भाजप सरकारच्या काळात सलग दुसऱ्या वर्षी दिलेली भाववाढही सर्वात कमी भाववाढ ठरली आहे. आम्ही सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांशी बोलून धानाला १७० रुपयापर्यंत भाववाढ दिली. याशिवाय धानाला बोनस देण्याचा देण्याचा निर्णयही आमच्याच सरकारने सर्वप्रथम घेतला होता, असे खा.पटेल यांनी सांगितले. एकीकडे उत्पादनाचा खर्च वाढत आहे. बियाणे, कीटकनाशकांच्या किमतीसह मजुरीचे दर वाढत आहेत. मात्र त्या तुलनेत हमीभावात अपेक्षित भाववाढ केल्या जात नाही. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना बोनसचे गाजर दाखविले आहे. पण पुढील वर्षी हा बोनसही मिळणार नाही. ही धान उत्पादकांची फसवणूकच आहे, असा आरोप खा.पटेल यांनी केला.२०११-१२ या हंगामात धानाचे भाव (जनरल ग्रेड) प्रतिक्विंटल १०८० रुपये होते. २०१२-१३ मध्ये त्यात १७० रुपयांची वाढ करण्यात आली. त्यानंतर २०१३-१४ मध्ये त्यात ६० रुपये प्रतिक्विंटल भाववाढ करण्यात आली. मात्र त्या हंगामात २०० रुपये प्रतिक्विंटल बोनस मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. आघाडी सरकारचे ते सत्तेतील शेवटचे वर्ष होते. मात्र गेल्यावर्षी २०१४-१५ मध्ये सत्ताबदल झाला. भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आले. हे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर धानाची पहिलीच भाववाढ त्यांनी अवघी ५० रुपये केली. त्यामुळे धानाला २०१४-१५ या हंगामात १३६० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव मिळाला. आता धान उत्पादक गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आपल्याला माफ करणार नाही, हे पाहून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून २५० रुपये बोनस देण्याचे गाजर भाजप सरकारने दाखविले आहे. पण ही कायमस्वरूपी दरवाढ नाही. त्यामुळे पुढील वर्षी हा बोनस काढून पुन्हा शेतकऱ्यांची फसवणूकच केली जाणार, असा दावा खा.पटेल यांनी केला. (जिल्हा प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेस करणार आंदोलनआता वर्ष २०१५-१६ च्या नवीन खरीप हंगामासाठी केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने जाहीर केलेल्या धानाच्या हमीभावात पुन्हा एकदा केवळ ५० रुपये भाववाढ केली. आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्षात असताना ३ हजार रुपये भाव देण्याची मागणी करणारे जिल्ह्याचे विद्यमान खासदार आता आपल्याच सरकारकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असताना कुठे गायब झाले, असा प्रश्नही खा.प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. निवडणूक होताच याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा खा.प्रफुल्ल पटेल यांनी दिला.