शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

धाबेटेकडीला वनग्रामचा तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार

By admin | Updated: July 29, 2016 01:50 IST

संत तुकाराम वनग्राम योजनेत तृतीय राज्यस्तरीय पुरस्कार तालुक्यातील धाबेटेकडी (आदर्श) या गावाला प्राप्त झाला आहे.

उत्कृष्ट कार्याचे फलित : उपवनसंरक्षकांनी केला समितीचा सत्कार अर्जुनी-मोरगाव : संत तुकाराम वनग्राम योजनेत तृतीय राज्यस्तरीय पुरस्कार तालुक्यातील धाबेटेकडी (आदर्श) या गावाला प्राप्त झाला आहे. यानिमित्त वन क्षेत्र अर्जुनी-मोरगावतर्फे धाबेटेकडीच्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांचा परिविक्षाधिन उप वन संरक्षक राहूल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वन व्यवस्थापन समितीने सहवनक्षेत्र धाबेटेकडी येथील राखीव वन कक्ष क्रमाक २६८ मधील ४०३.०७० हेक्टर जागेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वन समितीतर्फे सहवनक्षेत्र परिसर व गावात वनीकरण, मृद व जलसंपादण, वनसंरक्षण, वन वणवा प्रतिबंधक उपाय, वनक्षेत्रावरील अतिक्रमास प्रतिबंध, अवैध चराईस प्रतिबंध, वन्य पशू पक्षी संरक्षण, पाणवठे, श्रमदान, महिला-पुरूषांचा सहभाग, नवेत्तर पर्यायी इंधनाचा वापर, अभिलेख, नवसंकल्पना व जनजागृती इत्यादी कार्यांची काटेकोरपणए अंंमलबजावणी केली. यानिमित्त वन विभागाच्यावतीने समितीचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी परिविक्षाधिन उप वन संरक्षक राहूल पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी.रहांगडाले, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा उपसरपंच नुतनलाल सोनवाने, उपाध्यक्ष महादेव रामटेके, सुरेंद्र ठवरे, ओमप्रकाशसिंह पवार उपस्थित होते. धाबेटेकडी या गावाला वनग्राम म्हणून मिळालेला बहूमान हे गावकऱ्यांच्या मेहनतीचे फळ आहे. वनग्राम योजनेत मिळालेला पुरस्कार ही गौरवाची बाब आहे. आगामी काळात जोमाने कार्य करून राज्यात प्रथम येण्चा संकल्प गावकऱ्यांनी करावा वनविभाग सदैव गावकऱ्यांच्या पाठिशी राहील असा आशावाद पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. संचालन करून प्रास्तावीक क्षेत्रसहायक पी.के.ब्राम्हणकर यांनी केले. आभार वनरक्षक प्रवीण केळवतकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी वनरक्षक नागपूरे, सुलाखे, शहारे, राऊत यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सत्कार सन २०१४-१५ या वर्षातील हा पुरस्कार असून वनग्रामचा पुरस्कार पटकाविणारे धाबेटेकडी हे जिल्ह्यातील एकमेव गाव ठरले आहे. विशेष म्हणजे नागपूर येथे शुक्रवारी (दि.२९) पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेतला जात असून धाबेटेकडी वन व्यवस्थापन समितीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पुरस्कृत केले जाणार आहे. दीड लाख रूपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे.