शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भक्तिमय झाली व्यापारनगरी

By admin | Updated: April 16, 2016 01:12 IST

‘रामजीकी निकली सवारी...’ या गाण्याच्या सुमधूर धूनवर शेकडो रामभक्तांच्या गर्दीत गोंदियात निघालेली शोभायात्रा गोंदियावासीयांच्या डोळ््यांचे पारणे फेडून गेली.

‘जय श्रीराम’चा जयघोष : भव्य शोभायात्रेतील विविध देखाव्यांचे आकर्षणगोंदिया : ‘रामजीकी निकली सवारी...’ या गाण्याच्या सुमधूर धूनवर शेकडो रामभक्तांच्या गर्दीत गोंदियात निघालेली शोभायात्रा गोंदियावासीयांच्या डोळ््यांचे पारणे फेडून गेली. येथील श्रीराम जन्मोत्सव समितीच्यावतीने मंगळवारी (दि.८) रामजन्माचे निमित्त साधून ही शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत सहभागी रामभक्तांच्या सततच्या जयघोषाने अवघे शहर दणाणून गेले होते.श्रीरामाच्या जन्मोत्सवानिमित्त गोंदिया शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.येथील रामनगरस्थित राम मंदिरातून सायंकाळी शोभायात्रा निघाली होती. प्रथम दुपारी मंदिरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर शहरवासीयांच्या दर्शनार्थ शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेतील आकर्षक देखावे तर डिजे व ढोल-ताशांच्या गजरात बेधूंद नाचत असलेली तरूणाई शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत होती. रथात विराजीत श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमानाची आकर्षक मूर्ती शहरवासीयांच्या डोळ्यांचे पारणे फे डून घेणारी होती. ही शोभायात्रा रामनगर होत पाल चौक, उड्डाण पूल, नेहरू चौक, सिव्हील लाईन्स जयस्तंभ चौक, गांधी प्रतिमा होत निघाली. शोभायात्रेत श्री राम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुरेश अग्रवाल, भरत क्षत्रिय, बिपीन बावीसी, विजय बैस यांच्यासह समितीच्या अन्य पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येत तरूण व नागरिकांची उपस्थिती होती. याशिवाय चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत नागरिक सहभागी होते. या यात्रेत सहभागी नागरिकांसाठी शहरातील विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष व काही व्यक्तींकडून ठिकठिकाणी जलपानाची व्यवस्था केली होती. (शहर प्रतिनिधी)