अर्जुनी-मोरगाव : राजीव गांधी विकास तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र जनूककोष कार्यक्रमांतर्गत जैवविविधता व्यवस्थापन समिती प्रशिक्षण (७० समित्यांचे) पंचायत समिती सभागृह अर्जुनी-मोरगाव येथे घेण्यात आले.गावात जल, जमीन, जंगल स्थानिक परंपरा पूर्वी टिकवून ठेवण्यात लोकांचे योगदान फार मोठे होते. त्यामुळे जैवविविधता मोठ्या प्रमाणात होती. आज गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुर्नर निर्माण करुन जैविविधता संगोपनातून गावाचा विकास होवू शकते असे मत ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव व मार्गदर्शक अनिल बोरकर यांनी व्यक्त केले.अध्यक्षस्थानी सेवानिवत्त खंडविकास अधिकारी मांढरे होते. उद्घाटन जि.प. सदस्य गिरीष पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार अशोक पाटील, पोलीस उपनिरीक्षक पराग आनंद भाट, अनिल बोरकर, सुधीर धकाते, गौतम नितनवरे व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सर्व ७० ग्राम पंचायत निहाय जैवविविधता व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. बोरकर पुढे म्हणाले की, जैवविविधता कायदा २००२ चे लाभ सर्व ग्रामस्थांनी घेतला पाहिजे. त्याकरिता ग्रामपंचायत पातळीवर जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करुन आपल्या कार्यक्षेत्रात जैवविविधता व्यवस्थापन उपयोगाची परवानगी न नाकारण्याचे व संग्रहण शुल्क आकारण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे. लोकांच्या ज्ञानाचे व्यवस्थापन झाले पाहिजे तसेच गावातील संबंधित ज्ञानाच्या नोंदी रजिस्टर निर्माण करुन आपला विकास आराखडा निर्माण करुन गाव समृद्ध करण्याची गरज निर्माण झालेली आहे, असे याप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमात मंदा केशव गावडकर यांनी २० प्रकारच्या विविध गावरान जातीच्या धानाचे उत्पन्न सातत्याने घेत आहेत. त्याच्या प्रदर्शनी कार्यक्रमात दाखविण्यात आली. संचालन देवेंद्र राऊत, प्रास्ताविक सुधीर धकाते तर आभार देवेंद्र राऊत यांनी मानले. यशस्वितेसाठी छत्रपती बगमारे, चेतन राऊत, अजय मानकर यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
जैव विविधतेच्या संगोपनातून गावाचा विकास- बोरकर
By admin | Updated: March 26, 2017 00:55 IST