पालकमंत्री बडोले यांचे प्रतिपादन : विविध कामांची दिली माहिती कोसमतोंडी : आदिवासी गोवारी समाजाच्या न्याय मागण्यासाठी व विकासासाठी कटिबध्द असल्याचे मत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री, गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.कोसमतोंडी येथे आयोजित आदिवासी गोवारी स्मारक व गोवारी समाज मेळाव्याचे उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले. बडोले पुढे म्हणाले की, कोसमतोंडी परिसरातील विकास कामासंबंधी मी सतत प्रयत्नशील असून विठ्ठल-रुख्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार, खमाटा बायपास व नागझिरा गेट सुरू करण्याचा प्रयत्न शासन स्तरावर सुरू आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खा. नाना पटोले उपस्थित होते. अतिथी म्हणून डॉ. विनायक तुमराम, नारायरणराव शहारे, शालिक नेवारे, वासुदेव नेवारे, गोंदिया जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा रचना गहाणे, जि.प. सदस्या शीला चव्हाण, संत बांगळुबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक जगदीश येळे, माजी उपसभापती तथा गोवारी समाजाचे नेते दामोदर नेवारे, डॉ. अविनाश काशिवार, रामचंद्र कोहळे, डी.एम. राऊत, भाजपा तालुका अध्यक्ष विजय बिसेन, पं.स. सदस्य सुधाकर पंधरे, ब्रह्मानंद मेश्राम, सरपंच वंदना सोनटक्के, उपसरपंच महेंद्र पशिने, पोलीस पाटील लता काळसर्पे, ग्रा.पं. सदस्य काशिवार, गौरी काशिवार व इतर मान्यवर उपस्थित होते. मेळाव्याला संबोधित करताना खा. नाना पटोले म्हणाले की, गोवारी समाज बांधवाच्या न्याय्य मागणीसाठी की, गोवारी समाज बांधवाच्या न्याय मागणीसाठी आदिवासी नेत्यांच्या सहकार्याने संसदेत मुद्दा उपस्थित करणार असल्याचे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे कृषीविषयक अनेक योजनांची माहिती देऊन सर्व शेतकऱ्यांनी पीकविमा काढण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांना होत असलेल्या जंगली प्राण्यांचा त्रास थांबविण्यासाठी विविध योजना अंमलात येत असल्याचे व त्यासाठी आपण जातीने प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन बी.जे. नेवारे यांनी, प्रास्ताविक आर.एस. चौधरी तर आभार प्रभाकर नेवारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी गोवारी स्मारक समिती कोसमतोंडीचे अध्यक्ष हिवराज चौधरी, उपाध्यक्ष दवन वाघाडे, सचिव हिवराज काळसर्पे, समस्त पदाधिकारी, गावकरी व परिसरातील सर्व समाज बांधवानी सहकार्य केले. (वार्ताहर)
गोवारी समाजाचा विकास करणार
By admin | Updated: March 14, 2016 01:47 IST