शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

५० स्थळांचा विकास करणार

By admin | Updated: May 5, 2016 01:59 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यात ज्या-ज्या ठिकाणी गेले ते पुनित झाले आहे. त्यांनी भेटी दिलेल्या राज्यातील ५० स्थळांची निवड करण्यात आली असून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यात येईल,

पालकमंत्री : भीमघाट येथे बौध्द सामूहिक विवाहगोंदिया : डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यात ज्या-ज्या ठिकाणी गेले ते पुनित झाले आहे. त्यांनी भेटी दिलेल्या राज्यातील ५० स्थळांची निवड करण्यात आली असून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. १ मे रोजी छोटा गोंदिया येथील पांगोली नदीकाठावरील भिमघाट येथील बुध्द विहार परिसरात आयोजित बौध्द सामूहिक विवाह सोहळ्याचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी ए.बी. बोरकर, प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प. उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, भंते जीवन कीर्ती, भरत क्षत्रीय, धनंजय वैद्य, अशिम शेख, रतन वासनिक, वसंत गणवीर, श्याम चवरे, बंडू ठवरे, पौर्णिमा वालदे, कुंदा भास्कर, मंजुश्री बोरकर, गडपायले उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की, मागील २८ वर्षांपासून भीमघाट स्मारक समिती ही बौध्द सामूहिक विवाहाचे आयोजन करीत आहे. अनेक समाजात आजकाल सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. बौध्द समाजात सामूहिक विवाह सोहळे कमी होतात, ही संख्या वाढली पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामूहिक विवाह सोहळ्याची दिशा दिली. डॉ.बाबासाहेबांच्या विचारातून प्रेरीत होऊन ही समिती काम करीत आहे. बाबासाहेबांच्या अस्थीचे जतन भिमघाट समितीने केल्यामुळे हा परिसर पावन झाले. भिमघाटाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. भिमघाट समितीने विकासाचे नियोजन करावे, त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी वैवाहिक जीवनात प्रवेश करणाऱ्या नवदांम्पत्यांना त्यांच्या सार्थक जीवनासाठी आशिर्वाद दिला. बोरकर म्हणाले, डॉ.बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मागील २८ वर्षापासून आपण सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करीत आहोत. घरोघरी जाऊन विनंती करु न आपल्या पाल्यांचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यातच करण्याचा आग्रह करीत असतो. नवदाम्पत्यांना भावी जीवनात रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी मदत करण्यात येते. तर असलेला रोजगार आणखी भरभराटीस गेला पाहिजे यासाठी त्यांना मदत करीत असल्याचे सांगितले. विनोद अग्रवाल म्हणाले, सामूहिक विवाह सोहळे ही आज काळाची गरज आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीने भीमघाट समिती काम करीत आहे. भीमघाटच्या विकासासाठी आपणसुद्धा सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी १२ जोडपी या सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झाली. कार्यक्रमाला बौध्द बांधवांची हजारोच्या संख्येत उपस्थिती होती. संचालन लक्ष्मीकांत डहाट यांनी केले. भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यशस्वीतेसाठी कमलेश वैद्य, किसन भगत, राजू दोनोडे यांच्यासह स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व समाज बांधवांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)