शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

मुदतबाह्य इंजेक्शनचा शोध घेणार गुप्तहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 21:05 IST

येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जेंटामायसीन मुदतबाह्य इंजेक्शन आढळल्याचा प्रकार वीस दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. यानंतर यासाठी दोन चौकशी समिती गठीत करण्यात आल्या होत्या. या समितीने हे इंजेक्शन रुग्णालयातील नसून बाहेरील असल्याचा अहवाल दिला.

ठळक मुद्देकेटीएस रुग्णालयातील प्रकार : बाहेरील औषधी आत कशी, चौकशी समितीने दिला अहवाल, औषधसाठा मिस मॅच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जेंटामायसीन मुदतबाह्य इंजेक्शन आढळल्याचा प्रकार वीस दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. यानंतर यासाठी दोन चौकशी समिती गठीत करण्यात आल्या होत्या. या समितीने हे इंजेक्शन रुग्णालयातील नसून बाहेरील असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी या इंजेक्शनचा शोध घेण्यासाठी रूग्णालयातीलच काही वैद्यकीय अधिकाऱ्यांची गुप्तहेर म्हणून नियुक्ती केली असून ते याचा शोध घेणार आहे.केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मुदतबाह्य इंजेक्शन आढळल्याचा प्रकार नगरसेवक लोकेश यादव यांनी उघडकीस आणला होता. त्यामुळे संपूर्ण रुग्णालयात खळबळ उडाली होती.हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व्ही.पी.रुखमोडे यांनी दोन सदस्यीय चौकशी समिती नेमली. या प्रकरणाचे गांर्भिय ओळखत जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी याची चौकशी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीने केटीएस रुग्णालयाला भेट देवून रुग्णालयातील औषध साठ्याची पाहणी केली. त्यानंतर या संपूर्ण प्रकाराचा चौकशी अहवाल मंगळवारी(दि.७) जिल्हाधिकारी बलकवडे यांच्याकडे सोपविला. त्यात केटीएस रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आढळलेले मुदतबाह्य इंजेक्शन हे रुग्णालयातील नसून बाहेरील आहे. या इंजेक्शनवरील बॅच नंबर आणि रुग्णालयातील इंजेक्शनचे बॅच नंबर हे वेगळवेगळे आहे. शिवाय रुग्णालयाला पुरवठा करण्यात येणाºया इंजेक्शनवर नॉट फॉर सेल असे लिहिले असते आणि त्याच्यावर किमत सुध्दा नसते. त्यामुळे हे इंजेक्शन रुग्णालयातील नसून बाहेरुन आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता रूग्णालयातील अतिदक्षता विभागात हे मुदतबाह्य इंजेक्शन पोहचलेच कसे याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे याची चौकशी करण्यासाठी अधिष्ठाता रुखमोडे यांनी रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांची गुप्तहेर म्हणून नियुक्ती करुन या प्रकाराचा उलगडा करण्याची जबाबदारी सोपविली असल्याची माहिती आहे.रुग्णालयात इंजेक्शन पोहचविणाऱ्यावर फौजदारी कारवाईकेटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात मुदतबाह्य इंजेक्शन पोहचविल्याचा गंभीर प्रकाराच्या चौकशीनंतर हे इंजेक्शन बाहेरूनच रुग्णालयात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अतिदक्षता विभागात मुदतबाह्य इंजेक्शन पोहचविणाऱ्याचा शोध घेणे सुरू असून तो व्यक्ती सापडल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात करण्यात येणार असल्याची माहिती आहे.बॅच नंबर आणि नॉट फार सेलवरुन फुटले बिंगकेटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाला ज्या कंपनीतंर्गत औषधाचा पुरवठा केला जातो. त्या औषधाची बाहेर विक्री होवू नये यासाठी त्यावर नॉट फार सेल असे लिहिले असते.तसेच पुरवठा करण्यात येणाºया औषधांचा साठ्याला विशिष्ट बॅच क्रमांक दिलेला असतो. त्यामुळे औषध रुग्णालयातील आहे किंवा बाहेरचे हे सहज ओळखता येते. यासर्व गोष्टींवरुच मुदतबाह्य इंजेक्शनचे बिंग फुटले.सीसीटीव्हीसह आता अधिकाऱ्यांचे लक्षकेटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात मुदतबाह्य इंजेक्शन आढळल्यानंतर रुग्णालय प्रशासन खळबळू जागे झाले आहे. मुदतबाह्य इंजेक्शन हे बाहेरुन आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापनाने आता बारीक नजर ठेवली आहे. सीसीटीव्हीसह विशिष्ट अधिकाऱ्यांचे सुध्दा यासर्व प्रकारवर लक्ष राहणार आहे.केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मुदतबाह्य इंजेक्शन आढळल्याच्या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्यात आला. त्यात हे इंजेक्शन बाहेरुन आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहे.- व्ही.पी.रुखमोडे, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया.

टॅग्स :medicineऔषधंhospitalहॉस्पिटल