शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मशीन असूनही रेडिओलॉजिस्ट नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 21:22 IST

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थितीत सुधारणेचे काहीच चित्र दिसून येत नाही. महाविद्यालयात रूग्णांच्या सोयीसाठी एक्स-रे व सोनोग्राफी मशीन असताना रेडिओलॉजिस्ट नाहीत. अशात व्यवस्थापनाकडून कंत्राटी तत्वावर रेडियोलॉडिस्टची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभारी अधिष्ठातांच्या भरवशावर वैद्यकीय महाविद्यालयाची गाडी कशीतरी हाकली जात असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय महाविद्यालयातील स्थिती : एक तासासाठी कंत्राटी रेडिओलॉजिस्ट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थितीत सुधारणेचे काहीच चित्र दिसून येत नाही. महाविद्यालयात रूग्णांच्या सोयीसाठी एक्स-रे व सोनोग्राफी मशीन असताना रेडिओलॉजिस्ट नाहीत. अशात व्यवस्थापनाकडून कंत्राटी तत्वावर रेडियोलॉडिस्टची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभारी अधिष्ठातांच्या भरवशावर वैद्यकीय महाविद्यालयाची गाडी कशीतरी हाकली जात असल्याचे दिसून येत आहे.येथील वैद्यकीय महाविद्यालयाला केटीएस जिल्हा रूग्णालयातून एक्स-रे व सोनोग्राफी मशीन मिळाली आहे. त्यामुळे या दोन्ही मशीन्ससाठी रेडियोलॉजीस्टची व्यवस्था करणे महाविद्यालय व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. मात्र यात महाविद्यालय व्यवस्थापन अपयशी ठरत आहे.महाविद्यालयाला मागील कित्येक वर्षांपासून रेडियोलॉजिस्ट मिळत नसल्याने त्यांना कंत्राटी तत्वावर रेडियोलॉजिस्ट ठेवावा लागला आहे. मात्र हा रेडियोलॉजिस्ट फक्त एकच तास येत असून घाईघाईत तपासणी करून निघून जातो. या एका तासासाठी त्याला चांगली रक्कम दिली जात असल्याची माहिती आहे. यानंतर मात्र उर्वरीत २३ तास महाविद्यालयातील रूग्णांना या सेवांपासून वंचीत रहावे लागते.विशेष म्हणजे, या गंभीर समस्येला सोडविण्यासाठी काहीच प्रयत्न केले जात असल्याचे दिसत नाही. अशीच काहीशी व्यवस्था बाई गंगाबाई रूग्णालयात बघावयास मिळत आहे. वैद्यकीय महाविद्यालयात शस्त्रक्रीया केल्या जात असून यासाठी स्थायी बधिरीकरण तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे बधिरीकरण तज्ज्ञही कंत्राटी तत्वावर घेण्याची नौबत महाविद्यालय व्यवस्थपनावर आली आहे.२०० कर्मचाऱ्यांचा भार ६७ कर्मचाऱ्यांवरवैद्यकीय महाविद्यालयात २०० हून अधिक चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची गरज असल्याची माहिती अधीष्ठाता डॉ. वी.पी.रूखमोडे यांनी दिली. यात मात्र फक्त ६७ पद भरण्यात आले आहेत. त्यातही २२ सफाई कामगार सेवेत आहेत. एवठ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने २०० हून अधीक कर्मचाºयांचा भार या ६७ कर्मचाऱ्यांवर आला आहे.मापदंडांची पूर्तता नाहीचवैद्यकीय महाविद्यालय भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने ठरवून दिलेल्या मापदंडांवर चालविले जाते. मात्र येथील महाविद्यालय संस्थेच्या मापदंडांवर खरे उतरत नसल्याची माहिती अधीष्ठाता स्वत:च देत आहेत. महाविद्यालयात ३५० खाटांची व्यवस्था असमे गरजेचे असताना येथे मात्र त्यापेक्षा अर्ध्याच खाटा उपलब्ध आहेत.